Rudraksha : कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी धारण करा रुद्राक्ष! वाचा आश्चर्यकारक फायदे
मराठी बातम्या  /  धर्म  /  Rudraksha : कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी धारण करा रुद्राक्ष! वाचा आश्चर्यकारक फायदे

Rudraksha : कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी धारण करा रुद्राक्ष! वाचा आश्चर्यकारक फायदे

Published Jul 16, 2024 03:30 PM IST

Rudraksha Benefits : धार्मिक मान्यतेनुसार रुद्राक्षाची निर्मिती भगवान शिवच्या अश्रूंमधून झाली होती. त्यामुळेच रुद्राक्षाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे.

रूद्राक्ष धारण करण्याचे महत्व
रूद्राक्ष धारण करण्याचे महत्व

प्रत्येक धर्मात काही आभूषणांना विशेष महत्व असते. कारण ही आभूषणे देवीदेवतांशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात रुद्राक्षच्या माळेला प्रचंड महत्व आहे. कारण रुद्राक्षाचा थेट संबंध भगवान शंकरासोबत आहे. धार्मिक मान्यतेनुसार रुद्राक्षाची निर्मिती भगवान शिवच्या अश्रूंमधून झाली होती. त्यामुळेच रुद्राक्षाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. तसे तर रुद्राक्ष कधीही धारण केले तरी चालते. मात्र बहुतांश लोक पवित्र अशा श्रावण महिन्यात रुद्राक्षाची माळ धारण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शंकराचा शुभ आशीर्वाद लाभतो. शिवाय त्याचे आणखीनही फायदे आहेत जे आपण आज जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार, रुद्राक्ष मानवी शरीरासाठी एक संरक्षक ढाल म्हणून कार्य करते. येत्या ६ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ समजले जाते. रुद्राक्ष मनुष्याच्या आयुष्यातील विविध प्रकारचे अडथळे दूर करतो. अडचणीच्या काळात रुद्राक्ष अत्यंत प्रभावी मानला जातो. रुद्राक्ष धारण केल्याने आयुष्यात प्रगती होते आणि कार्यात एकाग्रता प्राप्त होते. त्यासोबतच तुमच्या मनात असलेली कोणत्याही प्रकारची भीती दूर होते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. कारण रुद्राक्ष कुंडलीतील सूर्याच्या स्थितीला मजबूत करण्यात मदत करतो. रुद्राक्षाचे अध्यात्मिकच नव्हे तर वैद्यकीय फायदेसुद्धा आहेत. रुद्राक्षाच्या मदतीने डोळ्यांचे विकार, हाडांची समस्या आणि उच्च रक्तदाब अर्थातच बीपी यांसारख्या समस्यांवरही मात करता येते.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला मानसिक आरोग्य लाभते. मनावरचा तणाव दूर होतो. मानसिक स्वास्थ्य सुधारते. शिवाय रागावरही नियंत्रण ठेवण्यात मदत करते. ज्या लोकांना विनाकारण राग येण्याची समस्या आहे. त्यांनी रुद्राक्ष धारण केल्यास लाभ मिळू शकतो. रुद्राक्षाच्या धारण करण्याने आयुष्यावर एक सकारात्मक प्रभाव पडतो. नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते.

रुद्राक्ष ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून बचावाचे कार्य देखील करते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असतील. तर रुद्राक्ष धारण केल्याने ग्रहदोष दूर होतात. ग्रहांचा तुमच्यावर असल्लेया नकारात्मक प्रभाव संपुष्ठात येऊन, शुभ प्रभाव पडायला सुरुवात होते. रुद्राक्ष धारण करण्याने ग्रहांची अंतर्दशा आणि महादशा दूर व्हायला मदत होते. शिवाय ध्यान साधनेतसुद्धा रुद्राक्ष एकाग्रतेसाठी मदत करतो. रुद्राक्षाच्या प्रभावाने मनुष्याच्या शरीराचे चक्र व्यवस्थित राहते. आरोग्याच्या समस्या दूर राहतात.

अनेकांना रुद्राक्ष कोणत्या वयाच्या लोकांनी धारण करावा असा प्रश्न पडतो. ज्योतिषअभ्यासानुसार मानसिक तणाव आणि रक्तदाब यापासून दूर ठेवण्यासाठी रुद्राक्ष खूप प्रभावी आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील लोक रुद्राक्ष धारण करू शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, रुद्राक्षाचेदेखील विविध प्रकार असतात. शिव महापुराण ग्रंथात एकूण १६ प्रकारच्या रुद्राक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच प्रत्येकाचे देवीदेवता, ग्रह, राशी आणि कार्ये यांचाही स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आहे. परंतु १ मुखी, ५ मुखी आणि १४ मुखी रुद्राक्षांचा सर्वाधिक वापर करण्यात येतो.

Whats_app_banner