मराठी बातम्या  /  धर्म  /  Shukrawar Upay : आयुष्य रोमान्सने भरेल, घरात समृद्धी नांदेल, पैशाची जाणवणार नाही कमतरता

Shukrawar Upay : आयुष्य रोमान्सने भरेल, घरात समृद्धी नांदेल, पैशाची जाणवणार नाही कमतरता

Mar 17, 2023 06:53 AM IST

Shukrawar Upay For Money : रोमान्स हा शुक्राचा स्थायीभाव आहे तर धनाची देवी लक्ष्मीचा वार म्हणूनही शुक्रवारकडे पाहिलं जातं. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर काही खास उपाय आहेत.

शुक्रवारचे उपाय
शुक्रवारचे उपाय (हिंदुस्तान टाइम्स)

शुक्र ग्रह सुख समृद्धी आणि रोमन्सचा कारक मानला जातो. याशिवाय हा दिवस देवी लक्ष्मीलाही समर्पित आहे. देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रह यांना आनंदी ठेवायचं असेल तर काही उपाय आहेत जे केले पाहिजेत. हे उपाय तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि रोमान्सने भरून टाकतील. जीवनात आनंद आणतील.

ट्रेंडिंग न्यूज

शुक्रवारी कोणते उपा. करावेत

माता लक्ष्मी आणि शुक्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुक्रवारचा उपवास हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. या दिवशी शुक्र देवाचा विशेष मंत्र “ओम शुन शुक्राय नमः” किंवा “ओम हिमकुंडमृणालाभम् दैत्यान परमं गुरुं सर्वशास्त्रं प्रवर्तकं भार्गवम् प्रणमयाहम्” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

माता लक्ष्मी आणि शुक्रदेव कधीच अस्वच्छ वातावरणात राहत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या सभोवतालचं वातावरण स्वच्छ ठेवा आणि घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

शुक्रवारचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे, त्यामुळे या दिवशी हा रंग जास्तीत जास्त वापरावा. शुक्रवारी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करूनच पूजा करावी.

व्रतासह या दिवशी शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे देखील शुभ आहे. तांदूळ, दूध, दही, मैदा आणि साखरेची मिठाई यासारख्या पांढर्‍या रंगाच्या वस्तूंचे दान शुक्रवारी करता येते. याशिवाय शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घालण्याने शुक्रदेवाची कृपा होते.

भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणूनच शुक्रवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. यामुळे धन-धान्य आणि वैभव प्राप्त होते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel
विभाग