shravan month 2023 in maharashtra marathi : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय पवित्र आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान भोलेनाथांचा आवडता महिना असल्याने अनेक लोक श्रावण महिन्याच्या दर सोमवारी उपवास ठेवून देवाची पूजा अर्चना करत असतात. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत योग्य समजला जातो. त्यामुळं श्रावण महिन्यात व्यक्तीसोबत घडणाऱ्या प्रत्येक कृतीचं आणि गोष्टीचे काही अर्थ असतात. याशिवाय महिन्यात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप दिसला तर सामान्य बाब नसते. त्याचे अनेक संकेत असतात. त्यामुळं तुम्हालाही तुमच्या स्वप्नात साप दिसत असेल तर त्याचे काय संकेत असतात, जाणून घेऊयात.
श्रावण महिना सुरू असताना तुमच्या स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला असेल तर तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची दाट शक्यता असते. याशिवाय धनप्राप्ती आणि आरोग्य संपदेचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळं श्रावण महिन्यात तुम्हाला स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर त्याचे कोणतेही वाईट अर्थ मानले जात नाही. स्वप्नात कुणी साप पकडताना पाहिलं तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या आयष्यातील अनेक गोष्टी पूर्ण होऊ शकतात, तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता असल्याचा त्याचा अर्थ सांगितला जातो. याशिवाय स्वप्नात साप पळताना दिसल्यास तुम्हाला विदेशात जाण्याची संधी असल्याचा अर्थ मानला जातो.
श्रावण महिन्यात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सोनेरी किंवा काळ्या रंगाचा साप दिसणं हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं. कारण येत्या काही दिवसांतच संबंधित व्यक्तीचं नशीब पालटून त्याचे दिवस बदलणार असल्याची मान्यता आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील कलह मिटतात. तसेच नोकरी, व्यापार आणि अन्य बाबींमध्ये स्वप्नात साप पाहणाऱ्या व्यक्तीला मोठा फायदा होण्याची शक्यता असते. त्यामुळं श्रावण महिन्यात पडणारी स्वप्न आयुष्याला दिशा देणारी आणि बदल घडवणारी असतात. त्यामुळं तुमच्या स्वप्नात साप दिसल्यास त्याचे अनेक सकारात्मक संकेत असल्याचं मानलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)