मराठी बातम्या  /  धर्म  /  Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला मारुतीला प्रसन्न करण्यासाठी करावे हे उपाय

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला मारुतीला प्रसन्न करण्यासाठी करावे हे उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Apr 01, 2023 12:35 PM IST

Take Blessings Of Maruti : एकीकडे मारुती आपल्याला ज्ञान काय असतं आणि ज्ञानी व्यक्तीची व्याख्या समजावून सांगतो तर दुसरीकडे भल्या भल्यांना आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर आपलसं करून घेतो. अशा श्री मारुतीरायाचा जन्म दिवस म्हणजेच हनुमान जयंती.

मारुतीला प्रसन्न कसं कराल
मारुतीला प्रसन्न कसं कराल (हिंदुस्तान टाइम्स)

येत्या 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भक्ती, शक्ती आणि ज्ञान आणि चातुर्य यांचा उत्तम मिलाऱफ म्हणजे बजरंगबली किंवा मारुती. एकीकडे मारुती आपल्या शक्तीने कैलास पर्वत उचलतो तर दुसरीकडे प्रभू श्रीरांमांच्या भक्तीत लीन होतो. एकीकडे मारुती आपल्याला ज्ञान काय असतं आणि ज्ञानी व्यक्तीची व्याख्या समजावून सांगतो तर दुसरीकडे भल्या भल्यांना आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर आपलसं करून घेतो. अशा श्री मारुतीरायाचा जन्म दिवस म्हणजेच हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाला प्रसन्न करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या गोष्टी कोणत्या ते पाहूया.

हनुमान जयंतीला मारुतीला कंस कराल प्रसन्न

मारुतीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या 11 पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून त्याचा हार बनवावा. त्यानंतर प्रभू रामाचे ध्यान करावं आणि तो हार मारुतीच्या गळ्यात घालावा.

हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो. मनाला शांती मिळते.

जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदूरी रंगाचे वस्त्र अर्पण करा. यामुळे कामात यश मिळेल. भाग्य तुमच्या सोबत राहील.

नशीब तुम्हाला साथ देत नसल्यास, तुमच्या कामात सतत अपयश येत असल्यास, कोणताही मार्ग दिसत नसल्यास, हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा करून त्यांना भगव्या बुंदीचे लाडू अर्पण करा. हनुमानजींच्या समोर बसून मारुतीस्तोत्राचा पाठ करा. तुमचे चांगले दिवस सुरू होतील.

तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी 21 वेळा मारुती स्तोत्र म्हणा. हनुमानजींच्या कृपेने संकट दूर होईल.

जर तुम्ही मुले, करिअर, आजार किंवा पैशांशी संबंधित समस्यांशी लढत असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान बाहुकचे किमान 5 वेळा पठण करा. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमचे प्रश्न सुटू शकतात.

हनुमान जयंतीला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ११ वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि सर्व प्रकारच्या समस्या आणि दोष दूर होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग