Mahashivratri 2024 : हजारो बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, दर्शनासाठी लोकांची गर्दी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahashivratri 2024 : हजारो बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, दर्शनासाठी लोकांची गर्दी

Mahashivratri 2024 : हजारो बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, दर्शनासाठी लोकांची गर्दी

Mar 08, 2024 02:48 PM IST

Kedarnath Temple replica on Maha Shivratri : प्रयागराज येथे बिस्किटांपासून केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बिस्किटांपासून बनवलेले केदारनाथ मंदिर पाहण्यासाठी संगमच्या काठावर मोठ्या संख्येने लोक येत आहेत.

हजारो बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, दर्शनासाठी लोकांची गर्दी
हजारो बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती, दर्शनासाठी लोकांची गर्दी

Kedarnath Temple replica made with biscuits : संपूर्ण देभरात आज शुक्रवारी (८ मार्च) महाशिवरात्री साजरी होत आहे. महाशिवरात्रीच्या संदर्भात भगवान शिवाशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत. सोबतच या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशीही मान्यता आहे.

महाशिवरात्रीला (Maha Shivratri 2024) भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते. या दिवसी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत. यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुख-समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

या सोबतच महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणेही शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फळ देतात.

या दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराज येथे बाबा केदारनाथच्या भव्य मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही प्रतिकृती बिस्किटांपासून बनवण्यात आली आहे. बिस्किटांपासून बनवलेले केदारनाथ मंदीर लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

अजय गुप्ता आणि त्यांच्या अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ललित कला विभागाच्या टीमने ४ दिवसांच्या मेहनतीनंतर हे मंदीर तयार केले आहे.

उत्तराखंडचे केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग आणि ४ धामांपैकी एक आहे. हे भगवान भोलेनाथांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. सोबतच अशी मान्यता आहे, अति भाग्यवान लोकच तेथे भेट देऊ शकतात.

बिस्किटांपासून बनवलेले केदारनाथ मंदिर पाहण्यासाठी संगमच्या काठावर मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. सोबतच अनेकांनी या प्रतिकृतीचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे.

Whats_app_banner