मराठी बातम्या  /  धर्म  /  Vrushik Sankranti : वृश्चिक संक्रांत आज, का करतात यावेळेला सूर्याची पूजा, काय आहे खास, वाचा सविस्तर

Vrushik Sankranti : वृश्चिक संक्रांत आज, का करतात यावेळेला सूर्याची पूजा, काय आहे खास, वाचा सविस्तर

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Nov 16, 2022 11:52 AM IST

Take Blessings Of Sun By Performing Pooja On This Day : सूर्यदेव तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करतात, या संक्रांतीला वृश्चिक संक्रांत म्हणतात.वृश्चिक संक्रांतीचा दिवस निसर्ग, हवामान आणि शेतीशी संबंधित कामांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

सूर्यदेव
सूर्यदेव (हिंदुस्तान टाइम्स)

सूर्यदेव तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करतात, या संक्रांतीला वृश्चिक संक्रांत म्हणतात. वृश्चिक संक्रांतीचा दिवस निसर्ग, हवामान आणि शेतीशी संबंधित कामांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ही संक्रांत धार्मिक व्यक्ती, आर्थिक कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विशेष शुभ मानली जाते. वृश्चिक संक्रांतीत सूर्य देवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि व्यवसाय व आर्थिक समस्या दूर होतात.

संक्रांतीचा काळ हा दान, श्राद्ध आणि पितृ तर्पण यांचा काळ मानला जातो. वृश्चिक संक्रांतीत तीर्थस्थानी स्नान करून पितरांचे श्राद्ध व तर्पण करावे. वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी स्नान दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने भगवान सूर्याचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी गरजूंना कपडे आणि धान्य दान करा. संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्यासोबतच गूळ आणि तीळ अर्पण करावे. प्रसाद म्हणून वाटून घ्या. वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी गोदान हे मोठे दान मानले जाते. संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट, मैदा, मसूर इत्यादी दान करा. तुम्ही धातू देखील दान करू शकता. धातूंचे दान केल्याने जीवनात येणारे प्रत्येक संकट टळते. या दिवशी श्राद्ध आणि पितृ तर्पण यांचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची विधिवत पूजा करावी. लाल तेलाचा दिवा लावा.गुगल धूप करा. केशर,कुंकू वगैरे अर्पण करा. सूर्यदेवाला लाल आणि पिवळी फुले अर्पण करा. गुळाचा हलवा आणि हळद आणि कूंकु मिसळलेले पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही.त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या