मराठी बातम्या  /  धर्म  /  February Shubh Muhurat : फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे मुहूर्त किती? या शुभ तारखांची नोंद करा

February Shubh Muhurat : फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे मुहूर्त किती? या शुभ तारखांची नोंद करा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 30, 2024 10:15 PM IST

Februay 2024 Vivah Dates: हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त निश्चितपणे पाहिला जातो. शुभ मुहूर्ताशिवाय कोणतेही काम करणे योग्य मानले जात नाही.

vivah shubh muhurt in febrauary
vivah shubh muhurt in febrauary

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त निश्चितपणे पाहिला जातो. शुभ मुहूर्ताशिवाय कोणतेही काम करणे योग्य मानले जात नाही. विशेषत: लग्न आणि गृह प्रवेशासाठी शुभ मुहूर्त पाळणे पूर्णपणे अनिवार्य आहे. 

धर्मग्रंथांमध्ये विवाह हे एक पवित्र बंधन मानले गेले आहे, ज्यामध्ये दोन मन आणि आत्मा कायमचे एकत्र राहतात. लग्न एखाद्या शुभ मुहूर्तावर झाले तर वधू-वरांचे वैवाहिक जीवन सुखी होऊन त्यांना देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळेच शुभ मुहूर्तांना हिंदू धर्मात खूप महत्व आहे.

चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि नामकरण सोहळ्यासाठी किती शुभ मुहूर्त आहेत?

फेब्रुवारी २०२४ लग्नासाठी शुभ दिवस

फेब्रुवारीमध्ये लग्नासाठीच्या शुभ तारखा- फेब्रुवारी महिन्यात लग्नासाठी ४, ६,७,८,१२,१३,१७,२४,२५,२६ आणि २९ या शुभ तारखा आहेत.

फेब्रुवारी २०२४ मध्ये गृह प्रवेशासाठी शुभ दिवस

गृहप्रवेशासाठी शुभ तारखा – फेब्रुवारी महिन्यात गृह प्रवेशासाठी १२, १४, १९, २४ आणि २६ या शुभ तारखा आहेत.

फेब्रुवारी २०२४ मध्ये नामकरणासाठी शुभ दिवस

नामकरणासाठी शुभ तारखा- फेब्रुवारी महिन्यात नामकरणासाठी १, २, ४, ८, ११, १४, १८, २१, २२, २५, २६ आणि २९ या शुभ तारखा आहेत.

मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नसतील

दरम्यान, या वर्षी मे आणि जून महिन्यात लग्नासाठी कोणताही शुभ मुहूर्त नसेल. वास्तविक, शुक्र २३ एप्रिल २०२४ रोजी अस्त होईल आणि २९ जून रोजी उदय होईल. सोबतच ६ मे पासून गुरु ग्रहही अस्त पावणार आहे, २ जून रोजी त्याचा उदय होईल. लग्नासाठी शुक्र आणि गुरू दोघांचा उदय होणे अनिवार्य आहे. यानंतर जुलैमध्ये लग्नासाठी ६ शुभ दिवस असतील.

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग