Vivah Panchami: हिंदू धर्मात प्रत्येक तिथी आणि सणाचे स्वतःचे विशेष असे महत्त्व आहे. हिंदू धर्मात विवाह पंचमीच्या दिवसाला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीराम आणि देवी सीता यांचा विवाह झाला होता. म्हणूनच हा दिवस भगवान श्रीराम आणि सीता माता यांचा विवाहोत्सव म्हणून साजरा केला जातो. हा विवाह मार्गशीर्ष मासाच्या शुद्ध पक्षाच्या पंचमीला असतो.
विवाह पंचमीच्या दिवशी, अर्थात मार्गशीर्ष मासाच्या शुद्ध पक्षाच्या पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. हिंदू धर्मात केळीचे झाड खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीता यांची भगवान विष्णूच्या रूपात पूजा केली जाते असे मानले जाते. भगवान विष्णूंना केळीचे झाड खूप आवडते. त्यामुळे या दिवशी केळीच्या पानांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांनी या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी.
केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित अशुभ दोष दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीचा बृहस्पति कमजोर असेल तर, त्या व्यक्तीने केळीच्या झाडाची पूजा करावी, असे केल्याने कुंडलीतील गुरूची स्थिती मजबूत होते. तसंच जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील आणि आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात, असेही मानले जाते.
विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा २०२४ मध्ये पंचमी तिथी ०५ डिसेंबर रोजी १२ वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल. तर, दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी १२ वाजून ०७ मिनिटांनी पंचमी तिथी समाप्त होईल. म्हणून शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी विवाह पंचमी साजरी केली जाणार आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या