Vivah Muhurat 2024 : एप्रिल महिन्यात लग्नासाठी फक्त काहीच मुहूर्त; 'या' तारखा अतिशय शुभ! पाहा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vivah Muhurat 2024 : एप्रिल महिन्यात लग्नासाठी फक्त काहीच मुहूर्त; 'या' तारखा अतिशय शुभ! पाहा

Vivah Muhurat 2024 : एप्रिल महिन्यात लग्नासाठी फक्त काहीच मुहूर्त; 'या' तारखा अतिशय शुभ! पाहा

Mar 29, 2024 06:36 PM IST

Vivah Muhurat In April 2024 : एप्रिल महिन्यात विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि तारखा कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया.

Vivah Muhurat In April 2024 एप्रिल महिन्यात लग्नासाठी मुहूर्त
Vivah Muhurat In April 2024 एप्रिल महिन्यात लग्नासाठी मुहूर्त

Vivah Muhurat April 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. धनु आणि मीन राशीमध्ये सूर्य देवाच्या संक्रमणामुळे देवांचा गुरु असलेल्या गुरूचा प्रभाव कमजोर होतो. यामुळे ३० दिवस खरमासचा काळ असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. 

सध्या सूर्य देव मीन राशीत विराजमान आहेत आणि १३ एप्रिल रोजी सुर्य मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना सरुवात होईल. अशा स्थितीत, एप्रिल महिन्यात लग्नाच्या शुभ तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

एप्रिल महिन्यातील विवाहाचे शुभ मुहूर्त

१८ एप्रिल रोजी लग्नाचा शुभ मुहूर्त आहे. हा दिवस माघा नक्षत्र आहे.

१९ एप्रिल रोजी लग्नाचा मुहूर्त आहे. हा दिवस सुद्धा एकादशीचा आहे. एकादशी तिथीला लग्न करणे उत्तम मानले जाते.

२० एप्रिललादेखील विवाहाचा शुभ मुहूर्त आहे. हा दिवस उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्याचबरोबर तिथी द्वादशी आहे.

एप्रिल महिन्यातील शेवटचा आरोह अर्थात लग्नाचा शुभ मुहूर्त २१ एप्रिल रोजी आहे. या दिवसाची तिथी त्रयोदशी आहे. त्याच वेळी, नक्षत्र फक्त उत्तर फाल्गुनी आहे. ज्योतिषशास्त्रात त्रयोदशी तिथीला विवाहासाठी शुभ मानते. लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी स्थानिक पंडितांचा सल्ला घ्या.

या महिन्यांत लग्न होणार नाहीत

ज्योतिषांच्या मते गुरु आणि शुक्र हे नक्षत्र अस्त झाल्यावर लग्न करू नये. २२ एप्रिलपासून शुक्र अस्तामुळे मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. यानंतर २ जुलैपासून लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत. त्याचबरोबर चातुर्मासामुळे १६ जुलै ते १२ नोव्हेंबर या काळात लग्नाचा शुभ मुहूर्त नाही. मात्र, यावेळी पंडितांचा सल्ला घेऊन आबुजा मुहूर्तावर विवाह करता येतो.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner