मराठी बातम्या  /  धर्म  /  Vivah Dosh Upay : विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत? एकदा करा हा उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

Vivah Dosh Upay : विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत? एकदा करा हा उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

HT Marathi Desk HT Marathi
Jun 29, 2024 03:45 PM IST

vivah dosh upay : ज्योतिषशास्त्रात विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांच्या सहाय्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती तर सुधारतेच. शिवाय तरुणाईला त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्यास मदत येते.

विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत? एकदा करा हा उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार
विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत? एकदा करा हा उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

आपल्या संस्कृतीत विवाह ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. व्यक्तीच्या आयुष्यात या शुभ सोहळ्याला विशेष महत्व आहे. प्रत्येक धर्मात विविध पद्धतीने लग्न जुळविले जातात. हिंदू धर्मात कुंडली आणि पत्रिका पाहून विवाह जुळविले जातात. हा एक अत्यंत शुभ सोहळा असतो. जो प्रत्येक मुलामुलींना हवाहवासा वाटतो. मात्र बऱ्याचवेळा मुलामुलींचे विवाह जुळून येण्यास अडचणी येत असतात.

अनेक प्रयत्न करुनसुद्धा लग्न ठरत नाही. बहुतांश लोकांसोबत तर लग्नाची बोलणी अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन सर्वकाही बिघडतं. त्यामुळे तरुणांच्या मनावर नकारत्मक परिणाम होतो. यामध्ये फक्त मुलेमुलीच नव्हे तर कुटुंबीयसुद्धा चिंताग्रस्त असतात. यामध्ये कुंडलीचा महत्वाचा वाटा असतो. जर एखाद्या मुला-मुलीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती कमजोर असेल, लग्नात अडथळे येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांच्या सहाय्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती तर सुधारतेच. शिवाय तरुणाईला त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्यास मदत येते. आज आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्याला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यामुळे अनेक मुली लग्नापूर्वी विविध प्रकारचे उपवास करतात. यातील सर्वात महत्वाचा म्हणजे १६ सोमवारचे व्रत. ज्योतिषीअभ्यासानुसार सांगण्यात येते की, जी तरुणी हे व्रत योग्यरीत्या पूर्ण करते तिला तिच्या पसंतीचा वर मिळतो. याशिवाय भगवान शंकराची पूजा करून वडाच्या झाडाची १०८ वेळा प्रदक्षिणा केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. शिवाय अनेक वर्षांपासून विवाहात येत असलेले अडथळे आपोआप दूर होतात.

शास्त्रानुसार माता सीतेची विशेष पूजा केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होतात. लग्नाचे चांगले प्रस्ताव येतात. यासोबतच जर एखाद्या मुलीने मंगळागौरी स्तुतीचा पाठ केला विवाहातील अडचणी तर दूर होतातच शिवाय मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. त्यामुळे विवाहात अडचणी येणाऱ्या मुलींनी हा उपाय अवश्य करावा.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहात अडचण येत आहे त्यांनी गरीब-गरजूंना गुप्त दान करावे. याची कोणालाही भनक लागू देऊ नये. असे केल्यास तुमच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात आणि लग्न जुळून येते. शिवाय विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारचा दिवस उत्तम समजला जातो. यादिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून कोणत्याही पवित्र नदीत किंवा पाण्यात स्नान करावे. सोबतच पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर पिंपळ किंवा वटवृक्षला जल अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच रात्री एक स्वच्छ कापड घेऊन त्यात हळकुंड बांधून उशीखाली ठेवावे. असे केल्याने विवाहात येत असलेलया समस्या दूर होतात. आणि लग्नासाठी मनासारखे प्रस्ताव येऊ लागतात.

WhatsApp channel