Vishwakarma Jayanti Shubhechha : दरवर्षी, विश्वकर्मा जयंती आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्वाने साजरी केली जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे पहिले शिल्पकार किंवा अभियंता मानले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, हा शुभ प्रसंग माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी (माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी) येतो. या वर्षी, विश्वकर्मा जयंती सोमवार १० फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा केला जात आहे.
विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. ही देखील यंत्रे आणि शस्त्र आहे. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करणे लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते.
विश्वकर्मा जयंती हा कारागिरीचा उत्सव आहे आणि कामात परिश्रम, नाविन्य आणि अचूकतेचे महत्त्व लक्षात ठेवण्याचा दिवस आहे. त्यामुळे यादिवशी आपण आपल्या कामात येणाऱ्या यंत्राप्रती कृतज्ञ होतो. तुमच्या प्रियजनांना या दिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि हा दिवस साजरा करा.
ॐ श्री विश्वकर्मणे नम:
भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या तुम्हाला
आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
…
दैवी वास्तुकार, सकळ सृष्टीचा निर्माता,
रक्षक आणि श्रुती धर्मा, आदि रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती
निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
…
ॐ पृथिव्यै नमः
ॐ अनंतम नमः
ॐ कूमयि नमः
ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः
विश्वकर्मा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांचे
निर्माण कर्ता भगवान श्री विश्वकर्मा
त्यांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा
…
पौराणीक काळातील इंजिनिअर मानल्या जाणाऱ्या
भगवान विश्र्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त
हार्दिक शुभेच्छा
…
तुम्ही दैवी निर्मात्याचा सन्मान करत असताना,
तुमच्या निर्मिती तुमच्या समर्पणाचे आणि
कठोर परिश्रमाचे प्रतीक असू द्या.
विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा!
…
भगवान विश्वकर्मा यांचे दैवी आशीर्वाद तुम्हाला
यश, समृद्धी आणि आनंदाचे जग निर्माण करण्यासाठी
खूप खूप मार्गदर्शन करोत
विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा
…
विश्वकर्मा जयंती साजरी करताना,
आपण शेतकऱ्यांपासून अभियंत्यांपर्यंत,
कलाकारांपासून ते वास्तुविशारदांपर्यंत,
आपल्या जगाला आकार देणाऱ्या असंख्य हातांचे स्मरण करूया.
प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या सौंदर्यात आणि कार्यक्षमतामध्ये योगदान देतो.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
संबंधित बातम्या