माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. पुराणे व महाभारतात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते. विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया.
सृष्टीचे रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा
...
दैवी वास्तुकार, सकळ सृष्टीचा निर्माता,
रक्षक आणि श्रुती धर्मा, आदि रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती
निमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
…
वास्तुकला कौशल्यामध्ये सर्वोत्तम
आणि विश्वाचे निर्माते
भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
…
ॐ श्री विश्वकर्मणे नम:
भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या तुम्हाला
आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
…
…
ॐ पृथिव्यै नमः
ॐ अनंतम नमः
ॐ कूमयि नमः
ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः
विश्वकर्मा जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांचे
निर्माण कर्ता भगवान श्री विश्वकर्मा
त्यांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
…
पौराणीक काळातील इंजिनिअर मानल्या जाणाऱ्या
भगवान विश्र्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त
खूप खूप शुभेच्छा
…
विष्णू देवांसह विश्वकर्मा यांची प्रतिमा स्थापन करावी. दोन्ही देवतांना हळद-कुंकू, अक्षता, गुलाल, वस्त्र, फूले अर्पण करावीत. पीठाची रांगोळी काढून त्यात सात प्रकारची धान्ये ठेवावीत. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. विष्णू देव आणि विश्वकर्मा यांची प्रार्थना करावी. धूप-दिप अर्पण केल्यानंतर ऋतूकालोद्भव फळे, मिष्ठान्न, पंचमेवा, पंचामृत यांचा नेवैद्य दाखवावा आणि आरती करावी.