चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित आहे. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी आणि शुक्ल पक्षात गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. तसेच उपवासही पाळला जातो. असे केल्याने साधकाला शुभ फल प्राप्त होते असे मानले जाते. चला, जाणून घेऊया फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत.
विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला येते.असे मानले जाते की या दिवशी जो कोणी श्रीगणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. याशिवाय ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते.
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १३ मार्च २०२४ रोजी पहाटे ४ वाजून ३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ मार्च २०२४ रोजी पहाटे १ वाजून २५ मिनिटांनी समाप्त होईल. अशा स्थितीत फाल्गुन महिन्यात १३ मार्च रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी गजकेसरी योगासोबत इंद्र योग, रवि योग व अश्विनी नक्षत्राचा प्रभाव राहील. या शुभ योगात चतुर्थी व्रत केले जाईल.
विनायक चतुर्थीला ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करून हिरवे वस्त्र परिधान करावे. श्रीगणेशाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी.चौरंगावर कापड पसरून श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करा. गाईच्या तुपाचा दिवा लावा, फाल्गुन विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला ५ लाल गुलाब व दुर्वाची जुडी अर्पण करा. यानंतर आरती करा आणि गणेश चालीसाचे पठण करा.
‘ॐ बुद्धी प्रदाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करा आणि पूजेनंतर हे मोदक तुमच्या मुलाला खायला द्या. उर्वरित इतर गरजू मुलांनाही वाटून द्या. या पद्धतीने गणपतीची पूजा केल्याने मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, असे मानले जाते. संततीच्या करिअरमध्ये चांगले यशही मिळते.
संबंधित बातम्या