Vinayak Chaturthi December 2024 Wishes In Marathi : भगवान गणेशाला बुद्धी आणि समृद्धीची देवता मानले जाते. सनातन धर्मात शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करण्याची परंपरा आहे. गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने कामात कोणताही अडथळा येत नाही, असे मानले जाते. चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
पंचांगात ४ डिसेंबर रोजी बुधवारी मार्गशीर्ष तृतीयेच्या दिवशी विनायक चतुर्थी दिलेली आहे. या दिवशी तृतीया समाप्ती १ वाजून १० मिनिटांनी होत असून, मध्यान्हकाली चतुर्थी तिथी मिळत असल्याने तृतीयेच्या दिवशी विनायक चतुर्थी दिलेली आहे. मात्र काही प्रदेशात १ वाजून १० मिनिटांपूर्वी मध्यान्ह समाप्ती होत असल्याने अशा सर्व प्रदेशांत दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ५ डिसेंबर रोजी गुरुवारी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाईल. अन्य सर्वत्र दिनांक ४ डिसेंबर रोजी विनायक चतुर्थी करावी.
ही या वर्षाची शेवटची विनायक चतुर्थीअसून, या निमित्त आपल्या प्रियजणांना हे शुभेच्छा पाठवून दिवसाचा आनंद द्विगुणीत करा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या.
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
श्रीगणेशाचा दैवी आशीर्वाद
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर
सदैव राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना!
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
...
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि
नमस्तेऽस्तु लंबोदरा यैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:
विनायक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
...
सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
...
वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
...
आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य,
शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
विनायक चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
...
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
...
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीच्या
सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा
...
तव मातेचे आत्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या