Vinayak Chaturthi 2023 : आजच्या विनायक चतुर्थी दिनी ५ शुभ योग; कशी करावी पूजा?
Vinayak chaturthi muhurta and puja vidhi : विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे विधीवत पूजा केली जाते. या पूजेमुळं आयुष्यातील विघ्नं दूर होतात अशी श्रद्धा आहे.
Vinayak Chaturthi 2023 : भगवान शंकराचा आवडता श्रावण महिना सध्या सुरू आहे. श्रावण महिना म्हणजे सण-उत्सव आणि व्रतवैकल्यांचा महिना. श्रावणात प्रत्येक दिवशी काही ना काही विशेष असते. आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आहे. गणपतीला समर्पित असलेल्या या दिवशी विशेष पूजा केली जाते. या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केल्यानं आयुष्यातील अनेक विघ्नं दूर होतात, अशी मान्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
असं आहे विनायक चतुर्थीचं महत्त्व
श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनानं केली जाते. गणेशपूजेशिवाय कोणताही मंत्र, जप, विधी यशस्वी होत नाही. विनायक चतुर्थीचा महिमा शास्त्रात सविस्तर वर्णन करण्यात आला आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्यानं व्यक्तीला सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. या दिवशी विघ्नहर्ता गणपतीची आराधना केल्यानं सर्व दुःखांचा नाश होतो.
विनायक चतुर्थीला ५ शुभ योग
> सर्वार्थ सिद्धी योग - २१ ऑगस्ट, सकाळी ०५.५३ ते ०४.२२ पर्यंत
> रवि योग - २१ ऑगस्ट, सकाळी ०६.२१ ते ०४.२२ पर्यंत
> अमृत सिद्धी योग - २० ऑगस्ट, सकाळी ५.५३ वाजेपासून दिवसभर
> साध्य योग - १९ ऑगस्ट रात्री ०९.१९ ते २० ऑगस्ट रात्री ०९.५८ वा.
> शुभ योग - २० ऑगस्ट, सकाळी ०९.५८ ते २१ ऑगस्ट रात्री १०.२० वा.
गणेश चतुर्थीची पूजा पद्धत
विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करावं. स्नानानंतर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून तांब्याच्या पात्रानं सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं. गणपतीच्या मंदिरात प्रसाद म्हणून खोबरे आणि मोदक ठेवावा. देवाला गुलाबाचं फूल आणि दूर्वा अर्पण करून ओम गण गणपतये नमः मंत्राचा २७ वेळा जप करावा आणि दीप उजळावेत. दुपारी गणेशपूजेच्या वेळी आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे किंवा मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणपतीची आरती करून, देवाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद म्हणून त्याचं वाटप करावं. या सेवेमुळं तुमच्यावर श्री गणेशाची कृपादृष्टी सदैव राहील.
विभाग