मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijaya Ekadashi : ६ व ७ ला विजया एकादशी ; जाणून घ्या व्रताची पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्व

Vijaya Ekadashi : ६ व ७ ला विजया एकादशी ; जाणून घ्या व्रताची पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्व

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 05, 2024 03:55 PM IST

Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात.सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. जाणून घ्या विजया एकादशीची पूजाविधी, शुभ मुहूर्त व महत्व.

विजया एकादशी २०२४
विजया एकादशी २०२४

पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे. यात माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचं व्रत करण्याची पद्धत आहे.

विजया एकादशी ६ व ७ मार्चला

यावर्षी विजया एकादशी ६ आणि ७ मार्च २०२४ रोजी साजरी केली जाईल. पंचांगानुसार ६ मार्चला ६ वाजून ३० मिनिटांनी एकादशी तिथीची सुरवात होईल, तर ७ मार्च २०२४ रोजी ४ वाजून १३ मिनिटांनी एकादशी तिथीची समाप्ती होईल.

स्मार्त व भागवत एकादशी तिथी

जर सूर्योदयाला दशमी तिथी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी तिथी संपली तर त्यादिवशी एकादशीचा क्षय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीचे व्रत केले जाते. ऋषी मुनी, ब्राम्हण पूजारी स्मार्त एकादशी पाळतात तर वैष्णव म्हणजे संसारी भक्तगण भागवत एकादशीचे व्रत पाळतात.

विजया एकादशीचे महत्व

पद्म पुराणानुसार, भगवान शंकरांनी स्वतः नारदास उपदेश करताना सांगितले होतं की, एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसंच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळतं, अशी श्रद्धा आहे.

विजया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.

एकादशी पूजा विधी

पूजेचे साहित्य - फळ, फूल, पंचामृत, धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई

स्नानादी कार्य करून देवघराची साफ-सफाई करा. भगवान विष्णूची आराधना करा. एकादशीच्या व्रताचा संकल्प करा. जल, गंगाजल, पंचामृत, पिवळी फुले, पिवळे चंदन भगवान विष्णूस अर्पण करा. दिवा लावा. विजया एकादशीच्या व्रत कथेचे पठण करा. मंत्र जप करा. विष्णूदेवाला नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून अर्पण करा. प्रसाद वाटून घ्या.

WhatsApp channel

विभाग