हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पंचांगानुसार शुक्रवार २१ जून २०२४ रोजी वटपौर्णिमा आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.
सर्व सण-उत्सव साजरी करण्याआधी शुभेच्छा देण्याची पद्धत पडली आहे, तेव्हा वटपौर्णिमेच्याही अशा खास शुभेच्छा शेअर करा, पोस्ट करा आणि स्टेटस ठेवा.
मोठ्यांचा आशीर्वाद,
पतीचे प्रेम,
सर्वकाही सुख लाभू द्या!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
…
नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…
जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…
वट सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा!
…
सात जन्माची साथ,
हाती तुझा हात..
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
…
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा
…
कायम राहो तुझी अशीच साथ,
दीर्घायुष्य लाभो खास!
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
…
सण हा सौभाग्याचा,
बंध हा अतूट नात्याचा,
सुखाचा आणि भाग्याचा…
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
…
विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली,
करण्या रक्षण सौभाग्याचे,
करूया वटपौर्णिमा साजरी
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा
…
मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
…
एक फेरा आरोग्यासाठी,
एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
…
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती –
पत्नीची दृढ साथ …
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी.पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
संबंधित बातम्या