Vat Purnima 2023 : 'अशी सावित्री, नको रे बाबा!', असं म्हणत अनेक सत्यवानांनी केलं वटसावित्री व्रत
Vat Savitri : नवरा बायको हे नातं सर्व नात्यांच्या पलिकडचे आहे. यात प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, तर राग किंवा रुसवा फुगवाही आहे. मात्र हाच राग काही पत्नींच्या ताब्यातून निघून जातो आणि मग त्या घरच्या वाट्याला दु:ख, दैन्य येतं.
वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना त्या वडाच्या झालाला सूत गुंडाळताना स्त्रिया करतात. मात्र काही पुरूषांनी चक्क वटपौर्णिमेचं व्रत केलंय. नाही जन्मोजन्मी हीच बायको मिळावी यासाठी नाही, तर पुढचे सात काय, सातशे जन्म मिळाले तरीही अशी बायको आम्हाला देऊ नकोस असं म्हणत या पुरूषांनी वटपौर्णिमेचं व्रत केलंय.
ट्रेंडिंग न्यूज
छत्रपती संभाजी नगर इथं पत्नी पीडित पुरूषांना हे व्रत केलंय आहे. नवरा बायको हे नातं सर्व नात्यांच्या पलिकडचे आहे. यात प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, तर राग किंवा रुसवा फुगवाही आहे. मात्र हाच राग काही पत्नींच्या ताब्यातून निघून जातो आणि मग त्या घरच्या वाट्याला दु:ख, दैन्य येतं.
बरं, बाईला काही त्रास झाला की महिला संरक्षण समिती, पोलीस, प्रशासन अनेक गोष्टी क्षणात त्या स्त्रीच्या मदतीला येतात, तिला तिचा हक्क किंवा संरक्षण देतात. मात्र हेच दु:ख काही पुरूषांच्या वाट्याला आलं की त्या पुरूषाच्या मदतीला फारसं कुणी उभं राहीलेलं पाहायला मिळत नाही. नेमक्या याच गोष्टीचा काही स्त्रिया फायदा घेतात आणि बिच्चारे पुरूष हतबल होऊन याकडे पाहात बसतात.
छत्रपती संभाजीनगर इथंही हे असेच बिच्चारे पुरूष पाहायला मिळाले ते चक्क वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना.
काय आहे या पुरूषांचं दु:ख?
काही बायका लग्नानंतर सासरच्या मंडळींचा हेवा करू लागतात. नवऱ्याला नवऱ्याप्रमाणे वागणूक देत नाहीत. काही बायका तर लग्न झाल्यावर नवऱ्याला साधं विचारतही नाहीत. मात्र त्यांच्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगायला सर्वात पुढे असतात. अशा पत्नी वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला मागेपुढेही पाहात नाहीत आणि यानं घरदार विस्कळीत होतं. नाहक बदनामीचे प्रसंग त्यांच्या परिवारावर ओढावतात असं या पुरूषांचं दु:ख आहे.
महिला सबलीकरण्याच्या नावाखाली कायदे स्त्री च्या बाजूने भक्कम करताना शोषित केवळ स्त्रियाच असू शकतात असं नाही तर वेळप्रसंगी पुरूषही शोषित असू शकतातहे हे कायदा विसरला अशी व्यथा या पुरूषांनी बोलून दाखवली. कायदा आमचं ऐकत नाही मग वडाला प्रदक्षिणा घातल्यानं तो देव तरी आमचं ऐकेल अशी भाबडी श्रद्धा ठेवत या पुरूषांनी आज मात्र लक्ष वेधून घेतलं.
विभाग