दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी २८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते २९ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदया तिथीनुसार २८ आक्टोबर रोजी, सोमवारी वसुबारस साजरी होईल. दिवाळीची पहिली पणती सोमवारी २८ ऑक्टोबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे.
वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वसुबारस हा सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात, समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी तसेच, भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध जोडला आहे. वसुबारसनिमित्त आपल्या प्रियजणांना हटके शुभेच्छा पाठवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा,
दे माय खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी..
वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा
…
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
…
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
…
वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा
…
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
…
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…
…
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
…
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,
माझ्या सर्व प्रियजणांना खूप खूप शुभेच्छा..!
…
पशु हे धन मानून
गाय व वासराच्या नात्यातील
निखळता, कृतज्ञता, शुद्धता
हे गुण स्मरण्याचा दिन वसुबारस
गोवत्स द्वादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
…
वसुबारसपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या