Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या ३ गोष्टी चुकूनही पाहू नका, वास्तुशास्त्रानुसार मानले जाते अशुभ!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या ३ गोष्टी चुकूनही पाहू नका, वास्तुशास्त्रानुसार मानले जाते अशुभ!

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या ३ गोष्टी चुकूनही पाहू नका, वास्तुशास्त्रानुसार मानले जाते अशुभ!

Nov 07, 2024 12:17 PM IST

Vastu Tips: सकाळची सुरुवात नेहमी चांगली असावी. सकाळची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी पाहू नयेत.

सकाळी उठल्याबरोबर या ३ गोष्टी चुकूनही पाहू नका, वास्तुशास्त्रानुसार मानले जाते अशुभ!
सकाळी उठल्याबरोबर या ३ गोष्टी चुकूनही पाहू नका, वास्तुशास्त्रानुसार मानले जाते अशुभ!

Vastu Tips: सकाळची सुरुवात नेहमी चांगली असावी असे म्हटले गेले आहे. आपली सकाळची सुरुवात जर चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो, असे मानले जाते. वास्तुशास्त्रामुसार अनेक गोष्टी करणे निषिद्ध मानले गेले आहे, तर अनेक गोष्टी करणे शुभ मानले गेले आहे. त्या प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी पाहू नयेत असेही मानले गेले आहे. सकाळी या गोष्टी पाहणे अशुभ असते असे मानले जाते. या गोष्टी पाहून आपला दिवस चांगला जात नाही, तो खराब होतो असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार सकाळी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ते…

सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नका

सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कधीही बंद घड्याळाकडे पाहू नका.  सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळाकडे पाहिले तर तुमचा दिवस चांगला जाणार नाही, असे वास्तुशास्त्रात मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ ठेवूच नये. घड्याळ बंद ठेवणे अशुभ मानले गेले आहे. बंद पडलेले घड्याळ घरात ठेवले तर सकारात्मक उर्जेचा स्तर घटतो आणि नकारात्मक उर्जा वाढते असे म्हटले गेले आहे. म्हणूनच घरात बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नये असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.

सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नका

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये असे सांगितले गेले आहे. सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहणे अशुभ मानले जाते. सकाळी उठल्याबरोबर आरशाकडे बघितल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. असे केल्याने नकारात्मक उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे. म्हणूनच सकाळी जाग आल्यानंतर प्रथम तोंड धुवावे आणि त्यानंतर मग आरशात पाहिले तरी चालते असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे.

सकाळी उष्टी, खरकटी भांडी पाहू नयेत

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उष्टी, खरकटी भांडी पाहू नयेत. सकाळी उष्टी खरकटी भांडी पाहणे शुभ मानले जात नाही. रात्री झोपण्यापूर्वी खरकटी भांडी धुवावीत. रात्री खरकटी भांडी घरात तशीच ठेवल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. हे लक्षात घेता, रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर झोपण्यापूर्वी घरातील सर्व उष्टी, खरकटी भांडी धुवून स्वच्छ करावीत.

Disclaimer: या लेखात दिलेली विधाने पूर्णपणे खरी आणि अचूक आहेत असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी उर्वरित सल्ला घ्या. 

Whats_app_banner