Vastu Tips: सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो घरात का लावावा? काय सांगतं वास्तुशास्त्र?
Vastu tips for Home: घरात सुखशांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक आहे सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो. त्याविषयी…
Right Direction of 7 Horse Painting: काही लोक आयुष्यभर कष्ट उपसत असतात, पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नाही. भरभराट त्यांच्यापासून दूरच राहते. अशा वेळी काही लोक नशिबाला दोष देत बसतात, पण दोष वेगळ्याच ठिकाणी असतो. तो वास्तुमध्येही असू शकतो. वास्तु दोष हा देखील प्रगतीमधील अडथळा असू शकतो, असं मानलं जातं.
ट्रेंडिंग न्यूज
वास्तुशास्त्रानुसार, घरात घोड्याचं चित्र असल्यास जीवनात सुख, समृद्धी येते आणि आर्थिक भरभराट होते. अर्थात, सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र योग्य दिशेनं लावणं आवश्यक आहे. सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र घरात कोणत्या दिशेला लावावं, याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? सात पांढऱ्या घोड्यांच्या चित्राचं महत्त्व काय? याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
- समुद्र किनाऱ्यावर धावणाऱ्या सात घोड्यांचं चित्र घराच्या हॉलमध्ये लावावं. हे चित्र लावल्यानं संबंधित व्यक्तीची आर्थिक प्रगती होते.
- घोड्यांचं चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा चांगली मानली जाते. मात्र, कार्यालयात दक्षिण दिशेला लावल्यानं आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता असते.
- वास्तूनुसार सात पांढऱ्या धावत्या घोड्यांचं चित्र घरात लावल्यानं देवी लक्ष्मी प्राप्त होते.
- हे चित्र लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा संपून घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
- धावत्या घोड्यांचं चित्र हे वेगाचं, शक्तीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे.
(ही माहिती वास्तुशास्त्रातील मान्यतांच्या आधारे देण्यात आली आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही किंवा हा कुठल्याही प्रकारचा सल्ला नाही. वास्तुशास्त्रात रस असलेल्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं यावर अंमल करावा.)