Vastu Tips : चैत्र नवरात्रीला काय कराल?, काय सांगतं वास्तुशास्त्र?
Vastu Shastra For Chaitra Navratri 2023 : एकीकडे दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाईल तर दुसरीकडे वास्तुशास्त्रही आपल्याला देवीच्या आगमनाच्या वेळेस काय करावं याची माहिती देत आहे.
हिंदू नव वर्षाच्या सुरुवातीलाच चैत्र नवरात्र सुरू होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशात दुर्गेच्या उत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. एकीकडे दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाईल तर दुसरीकडे वास्तुशास्त्रही आपल्याला देवीच्या आगमनाच्या वेळेस काय करावं याची माहिती देत आहे. देवी दुर्गेच्या आगमनाच्या वेळेस वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी केल्यास त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात असं वास्तुशास्त्र सांगतं.
ट्रेंडिंग न्यूज
चैत्र नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराल.
दरवाज्यावर देवाच्या पावलांचे ठसे लावावेत.
चैत्र नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावा. यामुळे संपत्ती वाढते. या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील.
ऑफिसचं प्रवेशद्वार कसं ठेवाल
चैत्र नवरात्रीच्या काळात कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. त्यात लाल आणि पिवळी फुले घाला. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी-व्यवसायातील समस्या दूर होतील.
ओम चं चिन्हं मुख्य दरवाज्यावर लावा
चैत्र नवरात्रीमध्ये ओमचे चिन्ह मुख्य दरवाजावर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले जाते. यामुळे सकारात्मकतेचा संचार होईल. नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरात सुख-समृद्धी राहील.
अखंड ज्योत दक्षिण पूर्व दिशेलाच ठेवा
चैत्र नवरात्रीमध्ये पूजेच्या ठिकाणी अखंड ज्योत दक्षिण-पूर्व दिशेलाच ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो.
दिवा लावताना काय काळजी घ्याल
दुर्गामातेचा दिवा लावताना त्याची दिशा तेलानुसार करावी. वास्तुशास्त्रानुसार देवीच्या समोर तुपाचा दिवा लावल्यास उजव्या हाताला आणि डाव्या हाताला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)