Lucky Plants for Home: वास्तुशास्त्रात अशा झाडांबद्दल सांगितले आहे जे घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा पसरते आणि मानसिक शांती मिळते. असे म्हटले जाते की ही रोपं लावल्याने घरात सकारात्मक आणि आनंदी भावना येते. हे प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते ५ रोपे लावणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या
हिंदू धर्मात मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे रोप घरात सुख- समृद्धी आणि आनंद आणते. घरात हे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. नात्यांमध्ये प्रेम वाढते. उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. हे रोप दक्षिणेकडे लावणे टाळावे.
बांबूचे झाड सुख, समृद्धी, शांती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की ते लावल्याने संपत्ती वाढते. ते घरी आणि ऑफिसमध्ये सुद्धा ठेवता येते. असे म्हटले जाते की हे प्लांट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. बांबूचे झाड लावण्यासाठी पूर्व किंवा आग्नेय दिशा शुभ मानली जाते.
वास्तुमध्ये स्नेक प्लांटला लकी मानले जाते. असे म्हटले जाते की हे रोप घरात लावल्याने घरातील वाईट नजर दूर होते. ते लावण्यासाठी शुभ दिशा पूर्व, दक्षिण किंवा आग्नेय आहे. हे रोप लिविंग रुममध्ये सुद्धा ठेवता येते. हे प्लांट रात्री ऑक्सिजन देते.
एलोवेरा म्हणजेच कोरफडीचे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. वास्तु, सौंदर्य, आयुर्वेद आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे. घरात कोरफडीचे झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हटले जाते. हे केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते.
जाईचे फूल त्याच्या सुंदर सुगंधासाठी ओळखले जाते. भगवान शिव, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना जाईची फुले अर्पण केली जातात. असे म्हटले जाते की हे रोप जीवनात मानसिक शांती आणते. घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला जाईचे रोप लावणे शुभ मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या