Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार आपली वास्तू कशी असावी हे सांगण्यात आले आहे. वास्तू बांधताना दिशेचे महत्वही फार आहे. जर आपली वास्तू चुकीची बांधली असेल तर त्यावरही काही तोडगे सांगण्यात आले आहेत. परंतू दैनंदीन जीवनात अनेक वेळा आपल्या घरातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. कुटुंबात लहान-लहान गोष्टींमुळे फार भांडण टोकाला जाते. याचा सरळ परिणाम आपल्यावरच होतो.
अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. करिअरमध्ये समस्या तसेच तब्येतीत चढउतार येतात. अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि तुमच्या घराची समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूच्या या प्रभावी टिप्स अवश्य करून पाहा.
घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपण भजन-कीर्तन करायला हवे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज शंख आणि घंटा वाजवा. त्याचबरोबर दिवे लावणीच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावे आणि संध्याकाळी भजन-कीर्तन करावे, यामुळे नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पूजा संपल्यानंतर संपूर्ण घरात शंखातील पाणी शिंपडणे शुभ मानले जाते.
घरामध्ये केर-कचरा, धूळ किंवा जाळे असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. त्यामुळे घराची नियमित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील कोळ्याच्या जाळ्यांमुळे खर्च वाढतो असे म्हणतात. त्यामुळे घरात जाळे राहणार नाही, फार केर-कचरा जमणार नाही याची काळजी घ्यावी.
जर कुंडलीत सूर्य ग्रह बलवान असेल तर जीवनात धन, समृद्धी आणि मान-सन्मानात कमी राहत नाही. त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी काही वेळ सूर्याच्या किरणांमध्ये बसल्याने जीवनसत्व मिळतात जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील सुखसोयी आणि घरातील आशीर्वाद वाढवण्यासाठी रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात लाल फुले, लाल कुंकू, काळे तीळ आणि अक्षदा मिसळून अर्घ्य अर्पण करावे.
देवाची नित्य पूजा करताना दररोज तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. त्याच वेळी, संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवा. कापूर, दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख-समृद्धी देखील राहते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)