Vastu Tips for Financial Luck : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वास्तूचे खूप महत्त्व आहे. वास्तुदोषांमुळे लोकांना नशीबाची साथ लाभू शकत नाही आणि धनसंचय करणे कठीण होते. दैनंदिन जीवनात वास्तुच्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
वास्तुमध्ये सांगितलेल्या काही नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि नकारात्मकता दूर होते. अनेक वेळा वास्तुदोषामुळे लोकांना जीवनात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुदोषामुळे लोकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या कोणत्या गोष्टी नशिबात अडथळा आणतात.
उशीजवळ पर्स ठेवून कधीही झोपू नये. अशा परिस्थितीत संपत्ती टिकत नाही. उशीखाली वर्तमानपत्र, पुस्तक किंवा छायाचित्र घेऊन झोपल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. रात्री झोपताना पाण्याची बाटली ठेवल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. रात्री झोपताना बेडजवळ घड्याळ, मोबाईल, आयपॅड वगैरे काहीही ठेवू नये. या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो. जर तुमचे टॉयलेट स्वच्छ नसेल तर समजून घ्या तुमच्या पैशाचा अपव्यय थांबणार नाही.
वास्तुनुसार पुस्तक हे बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध ग्रह ज्ञान, बुद्धी, मन आणि वाणिसाठी जबाबदार आहे, त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका, असे केल्यास बुध ग्रह कमजोर होऊ शकतो.
वास्तुनुसार मीठ चंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे मीठ कधीही उघडे ठेऊ नका. कारण यामुळे कुंडलीत चंद्र कमजोर होऊ शकतो.
कपाट कधीही उघडे ठेवू नये. अनेकदा काहीजण पैसे किंवा कपडे काढल्यावर कपाट उघडे ठेवतात, असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते.
वास्तुनुसार जेवण कधीही उघडे ठेवू नका. यामुळे अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि अन्नधान्य तसेच पैशाची चणचण निर्माण होऊ शकते.
मुख्य गेटसमोर तुमचे मंदिर आहे, हे योग्य नाही. यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. घरामध्ये कोरडी किंवा काटेरी झाडे लावू नका. यामुळे नकारात्मकता वाढते. घराचे मुख्य गेट कधीही बाहेरून उघडू नका. ते आतून उघडल्यास शुभ असते. घराबाहेर डस्टबिन ठेवू नका, यामुळे जीवनात आणि घरात त्रास वाढतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)