Vastu Remedy for Sleep : वास्तुशास्त्र हे अनेक नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत बदलण्याचे विशेष शास्त्र आहे. घर, कुटुंब, व्यवसाय, नोकरी, प्रेम सर्व बाबतीत वास्तू संबंधित काही गोष्टी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, आणि आपल्या जीवनात चांगले बदल घडवू शकतात. दैनंदिन जीवनात आपल्याला पदोपदी अनेत अडचणी येत असतात त्यावर मार्ग शोधत शोधत आपण आपल्या जीवनात रंग आणतो आणि आनंदात जगत असतो. दैनंदिन जीवनात आपल्या मानसिक आणि शारिरीक थकवा दूर करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोप ही आहे.
आज काल झोप न येण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. अनेक वेळा लोक चांगली झोप घेण्यासाठी औषधांचा आधार घेतात, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नसते. जर तुम्हालाही निद्रानाशाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काळजी करण्याची गरज नाही, हे काही वास्तु उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
जर तुमच्या पलंगाच्या समोर टेलिव्हिजन वगैरे असेल तर ते काढून टाका. याशिवाय चांगल्या झोपेसाठी तुमच्या बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात मोती ठेवा. तमालपत्र आणि गोमती चक्र आपल्या पलंगाच्या वर म्हणजेच डोक्याजवळ गादीखाली ठेवा. रात्री झोपताना तुमच्या बेडरुममध्ये वातावरण चांगले करण्यासाठी चांगले संगीत लावा. यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. शक्य असल्यास, अंघोळ करा किंवा झोपण्यापूर्वी हात पाय धुवा. रुद्राक्ष आणि सात चक्राचे स्फटिकाचे ब्रेसलेट धारण करा.
वास्तुशास्त्रानुसार जर बेडरुममध्ये फ्रीज, इन्व्हर्टर किंवा गॅस सिलेंडर ठेवले असेल तर ते काढून टाका. खोलीत ठेवलेल्या या गोष्टी झोपेत अडथळा आणतात असे वास्तू सांगते. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्र सांगते की, झोपण्याच्या खोलीत काटेरी किंवा टोकदार वनस्पती ठेवू नये. याशिवाय बेडरूमचा एसी किंवा पंखा बिघडला असेल किंवा चालू असताना आवाज येत असेल तर लगेच दुरुस्त करा. या गोष्टींमुळेही झोपेची समस्या निर्माण होते, असे म्हटले जाते.
निरुपयोगी वस्तू किंवा रद्दी कधीही पलंगाखाली ठेवू नये. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात, असे वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)