श्रावण महिना सुरू आहे, श्रावण महिन्यात झाडे लावल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येते. धार्मिक दृष्टीकोनातून झाडे लावणे शुभ देखील मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता येते असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात काही झाडे लावणे वास्तुच्या दृष्टिकोनातून फार शुभ मानले जाते.
पवित्र श्रावण महिना भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी असतो. अशात तुम्हालाही श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घ्यायला जमत नसेल तर घरच्या घरी हे काम करा, श्रावणामध्ये कोणती झाडे लावावीत ते जाणून घ्या.
वास्तुशास्त्रात ५ अशा झाडांचे वर्णन केले आहे. जे श्रावण महिन्यात लावल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होईल आणि भक्तांवर कृपा करतील.
भगवान शिवाला रूईचे फूल खूप आवडते. हे जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात. सुख-समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी श्रावणात हे झाड तुम्ही लावू शकता. या वनस्पतीमध्ये भगवान शिव वास करतात असे मानले जाते.
शमीचे रोप श्रावण महिन्यात लावणे खूप शुभ मानले जाते, कारण हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. शमीचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. या रोपाची लागवड करण्यासाठी सर्वात शुभ दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते. श्रावणात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. ही वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
भगवान शंकराला धोत्र्याचे झाडही आवडते. सांगितले जाते की, या झाडामध्ये पैसा आकर्षीत करण्याची खास क्षमता असते. जर भगवान शंकराचा पवित्र महिना श्रावणात हे झाड लावल्यास आपल्या घरात आनंदी आनंद नांदतो.
चाफ्याच्या झाडाला हर्बल ट्री मानले जाते. या झाडामध्ये वायुप्रदूषण दूर करण्याची क्षमता असते. चाफ्याच्या फूलांचा सुगंध उत्तम असतो. हे झाड पाणी न देताही फार काळ जगू शकतं आणि चाफ्याचे झाड घरात किंवा अंगणात कुठेही लावू शकतात. घरात हे झाड लावल्याने भाग्याची खास साथ लाभते.
भगवान शंकराला बेलपत्र वाहण्याची खास परंपरा आहे. महादेवाच्या पूजेत बेलपत्र वापरायला फार महत्व आहे. श्रावण महिन्यात हे रोप लावल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धीची वृद्धी होईल आणि देवी लक्ष्मीचा वास राहील. बेलपत्राच्या रोपाच्या सावलीत शिवलिंग ठेवून रोज जलाभिषेक केल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता भासणार नाही.