मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असावी? असं असेल तर पहिल्या दिवसापासूनच प्रेम वाढेल, जाणून घ्या

Vastu Tips : नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असावी? असं असेल तर पहिल्या दिवसापासूनच प्रेम वाढेल, जाणून घ्या

Jun 20, 2024 07:25 PM IST

vastu tips for newly married couple : वास्तूनुसार, जर नवविवाहित जोडप्याची खोली योग्य दिशेला नसल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माम होऊ शकतात. अशा परिस्थितीत नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असणे अशुभ मानले जाते, हे जाणून घेऊया.

Vastu Tips : नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असावी? असं असेल तर पहिल्या दिवसापासूनच प्रेम वाढेल,  जाणून घ्या
Vastu Tips : नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असावी? असं असेल तर पहिल्या दिवसापासूनच प्रेम वाढेल, जाणून घ्या

vastu tips for newly married couple : वास्तुशास्त्रात दिशांना सर्वात महत्त्वाचे स्थान दिले जाते. वास्तूनुसार कोणतेही काम योग्य दिशेला तोंड करून केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, लग्नानंतर नवविवाहित जोडप्यासाठी घराच्या कोणत्या दिशेला खोली असावी. 

ट्रेंडिंग न्यूज

तसेच, नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असल्यास वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.

लग्न हे ७ जन्मांचे बंधन मानले जाते. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांचे सुरुवातीचे आयुष्य प्रेम आणि रोमान्सने भरलेले असायला हवे. परंतु काहीवेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात समस्या उद्भवू शकतात. या समस्यांची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यापैकी एक कारण वास्तुदोष असू शकतो.

वास्तूनुसार, जर नवविवाहित जोडप्याची खोली योग्य दिशेला नसल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माम होऊ शकतात. अशा परिस्थितीत नवविवाहित जोडप्याची खोली कोणत्या दिशेला असणे अशुभ मानले जाते, हे जाणून घेऊया.

नवविवाहित जोडप्याची खोली या दिशेला नसावी

नवविवाहित जोडप्याची खोली कधीही उत्तर, दक्षिण, उत्तर-पूर्व आणि आग्नेय दिशेला नसावी. या दिशांना खोली असल्यास वैवाहिक जीवनात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही भांडणे होऊ शकतात.

नवविवाहित जोडप्याची खोली या दिशेला असावी

लग्नानंतर प्रत्येकाला आपल्या जीवनात प्रेम आणि रोमान्स हवा असतो, जोडीदारासोबत हँग आउट करायचं असतं. आयुष्यात काही नवीन आणि चांगले अनुभव घ्यायचे असतात. यासाठी वास्तूनुसार नवविवाहित जोडप्याची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी. या दिशेला खोली असल्यास वैवाहिक जीवनात रोमान्स तर वाढतोच, शिवाय जीवनातील इतर अनेक समस्या दूर होतात.

या गोष्टींचीही काळजी घ्या

नवविवाहित जोडप्याचा पलंग कधीही धातूचा नसावा. नवविवाहितांसाठी चौकोनी लाकडी पलंग शुभ मानला जातो. तथापि, बेडच्या आत कोणत्याही धातूच्या वस्तू, भेटवस्तू, भांडी असू नयेत हे लक्षात ठेवा. 

तुम्ही नवविवाहित जोडप्याचे कपडे बेडच्या आत ठेवू शकता. नवविवाहित जोडप्यांच्या खोलीचा रंगही हलका ठेवावा, नवविवाहित जोडप्यांच्या खोलीत निळा आणि काळा रंग कधीही वापरू नये.

नवविवाहित जोडपे खोलीच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर त्यांच्या लग्नाचे फोटो लटकवू शकतात. याशिवाय खोलीत फुले, अत्तर इत्यादी ठेवणे चांगले मानले जाते. झोपताना नवविवाहित जोडप्याचे डोके दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे. नवविवाहित जोडप्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील अनेक समस्या संपुष्टात येतात.

WhatsApp channel
विभाग