vastu tips for home: वास्तुशास्त्रानुसार धन वाढवण्यासाठी काही गोष्टी घरात असणे अत्यंत आवश्यक आहे. या वस्तू घरात असणे शुभ मानले जाते. घरातील वास्तुदोषांमुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते. या वस्तू घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. चला जाणून घेऊया घरात कोणकोणत्या वस्तू ठेवणे शुभ आहे...
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणपतीचे चित्र लावणे शुभ असते. गणपतीचे चित्र लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. श्रीगणेशाच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप असावे. तुळशीचे रोप शुभ मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मकता येते. घरात तुळशीचे रोपटे ठेवल्याने सुख- समृद्धी नांदते. त्याच प्रमाणे कुटुंब आर्थिक संकटांपासूनही दूर राहते असे मानले जाते. इतकंच नाही तर, घरातील हवा शुद्ध होते.
घरात एखादे मंदिर असावे आणि दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात दिवा लावावा. असे केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. मात्र हेही लक्षात असू द्या की, घरातील मंदिराला घुमट किंवा शिखर असता कामा नये. असे असणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. दुसरे म्हणजे घरात जर पायऱ्या असतील , तर त्या पायऱ्यांखाली मंदिर असू नये. घरातील पायऱ्यांखाली मंदिर असणे अशुभ मानले गेले आहे.
घराच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. ज्या घरात आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू एकत्र आहेत, त्या घरात तुम्ही चित्र किंवा मूर्ती देखील ठेवू शकता. हिंदू धर्मात लक्ष्मीला धनाची देवी मानलं गेलं आहे. लक्ष्मीची कृपा झाली तर माणसाला अपार संपत्ती प्राप्त होते असं म्हणतात. घरात लक्ष्मीचे चित्र किंवा फोटो ठेवणे शुभ असतेच पण तो फोटो कोणत्या दिशेला हवा याला विशेष असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला लक्ष्मीचा फोटो कधीही लावू नये. जर असे केले तर घरात गरिबी येते. तसेच आपण साठवलेला पैसा देखील निघून जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उभ्या लक्ष्मीचा फोटो असू नये. लक्ष्मी ही कमळाच्या फुलात बसलेली असावी.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.