परीक्षेत यश मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, मात्र अनेकदा अभ्यास करूनही विद्यार्थ्यांचे हे स्वप्न अधुरेच राहते. अभ्यास करूनही एखाद्या विद्यार्थ्याला परिक्षेत चांगले गुण मिळत नसतील किंवा अपेक्षित यश मिळत नसेल तर यात वास्तू दोष मुख्य कारण मानले जाते.
जर तुम्हाला परीक्षेत अपेक्षित यश येत नसेल तर वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही परिक्षेत यश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया वास्तुच्या त्या उपायांबद्दल, ज्यांचे पालन केल्यास परिक्षेत यश मिळू शकते.
- परीक्षेत यश मिळवायचे असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घाला. कारण अशी मान्यता आहे की, हा उपाय केल्याने बुध ग्रह बलवान होतो आणि अभ्यासात मन लागते.
-अभ्यास करत असताना तुम्ही बसत असलेल्या दिशेकडे विशेष लक्ष द्या. उत्तर-पश्चिम दिशेला बसून अभ्यास करावा. असे केल्याने शांती आणि शक्ती प्राप्त होते.
- दररोज तुळशीची विधिवत पूजा करा. असे केल्याने मन शांत आणि एकाग्र होते. त्यामुळे अभ्यासात मदत होते.
- दररोज स्नान केल्यानंतर देवी सरस्वतीची पूजा करावी. यानंतर दिवा लावून आरती करावी. परीक्षेत चांगले गुण आणि यशासाठी प्रार्थना करा.
-परीक्षेला जाण्यापूर्वी ‘ओम ऐं ह्रीं सरस्वत्याय नमः’ या मंत्राचा खऱ्या मनाने जप करा. या मंत्राचा जप केल्याने आत्मविश्वास वाढतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)