Vastu Tips : स्वयंपाकघरातील या ४ गोष्टी कधीही संपू देऊ नका, सुख-समृद्धी व भरभराट राहील-vastu tips dont run out of these 4 things in kitchen ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : स्वयंपाकघरातील या ४ गोष्टी कधीही संपू देऊ नका, सुख-समृद्धी व भरभराट राहील

Vastu Tips : स्वयंपाकघरातील या ४ गोष्टी कधीही संपू देऊ नका, सुख-समृद्धी व भरभराट राहील

Feb 21, 2024 05:43 PM IST

Vastu Upay : दैनंदीन जीवनात वास्तुशास्त्राचे फार महत्व आहे. वास्तूनुसार काही गोष्टी नसल्या तर अडथळे, अडचणी पाठ सोडत नाही. तेव्हा वास्तुशास्त्रानुसार या ४ गोष्टी स्वयंपाकघरातून कधीही संपू देऊ नका.

Vastu Tips
Vastu Tips

घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य जेवण करतात. म्हणून स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकाराचे दोष आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातील साऱ्या सदस्यांवर पडतो. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका. या गोष्टी जास्तीच्या प्रमाणात आणून ठेवावे, संपायच्या आत घेऊन यावे किंवा संपल्यावर लगेच आणाव्यात.

मीठ -

मीठ आपल्या आहारात सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मीठ तर प्रत्येक घरात असतंच पण कधी-कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आतासाठी तर आहे उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपवून टाकतो. पण असे करू नये, मिठाला पूर्ण संपवू नये. मीठ संपण्याचा पूर्वीच घरात मीठ आणून ठेवावं. जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते. यामुळे वास्तुदोष लागतो. ज्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो. त्याच बरोबर घरात पैशांची चणवण जाणवते.

हळद -

हळद असा मसाला आहे. जे अन्नाचं रूप सुधारून अन्नाचे सौंदर्य वाढवतं. हळद शुभ कार्यात आणि पूजेतही वापरले जाते. भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे. घरात हळद संपल्यानं गुरु ग्रहाचा दोष लागतो. म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये. जास्तीची हळद आणून ठेवावं किंवा संपण्याच्या पूर्वी घरात आणून ठेवावं. घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही. शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका.

गव्हाचं पीठ -

गव्हाचं पीठ सर्वात महत्त्वपूर्ण असतं. म्हणून गव्हाचं पीठ संपण्यापूर्वीच घरात पीठ आणले जाते. पण कधी-कधी घरात गव्हाचं पीठ पूर्ण संपून जातं. अश्या परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवता त्यामध्ये थोडेसे पीठ ठेवा, ते पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्याच डब्या मध्ये गव्हाचं पीठ आणून ठेवा. घरात पीठ संपल्यावर आपल्याला मान सन्मानासंबंधी नुकसान संभवते.

तांदूळ -

तांदुळाचा उपयोग अन्नाबरोबरच पूजेमध्ये देखील होतो. अक्षता (पूजेत वापरला जाणारा तांदूळ) याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो. शुक्र ग्रहाला भौतिक सुख समृद्धीचा घटक मानला जातो. म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये. घरात नेहमी तांदूळ असल्यानं घर धन-धान्याने भरलेले असतं.

Whats_app_banner
विभाग