मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips: दररोज न चुकता करा ‘ही’ कामं! कैकपटींनी वाढेल घरातील सुख समृद्धी

Vastu Tips: दररोज न चुकता करा ‘ही’ कामं! कैकपटींनी वाढेल घरातील सुख समृद्धी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 26, 2024 05:06 PM IST

Vastu Tips: घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्याने सुख-समृद्धीवरही वाईट परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा काही सोप्या उपायांनी कमी करता येते.

दररोज न चुकता करा ‘ही’ कामं! कैकपटींनी वाढेल घरातील सुख समृद्धी
दररोज न चुकता करा ‘ही’ कामं! कैकपटींनी वाढेल घरातील सुख समृद्धी

Vastu Tips For Prosperity: घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल, तरच धनात आणि सुखसमृद्धीतही वाढ होते. घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकते. नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरातील व्यक्तींच्या आनंद आणि समृद्धीवरही नकारात्मक प्रभाव पडतो. अशावेळी वास्तुशास्त्रानुसार, काही सोप्या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी केली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरातील सुख-समृद्धी वाढवण्यासाठी दररोज या ६ गोष्टी आवर्जून करा.

घर स्वच्छ ठेवा

घरात असलेली अस्वच्छता आणि घाण नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर घरात अनावश्यक वस्तू जमा करून ठेवू नका. घराती अनावश्यक अडगळ, रद्दी आजच घराबाहेर काढून फेका.

दिवा लावा

दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. असे मानले जाते की, संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते.

Vastu tips : घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे सोपे उपाय करा, वातावरणात प्रसन्नता निर्माण होईल

तोरण लावा

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर लावा. तोरणामध्ये वापरलेली आंब्याची पाने ही ताजी हिरवी असावी आणि कातरलेली असू नयेत, हे कटाक्षाने लक्षात ठेवा.

मिठाच्या पाण्याने फारशी पुसा

जर तुमच्या घरात दररोज निराशा वाटत असेल, किंवा वारंवार संकटाचे वातावरण येत असेल, तर त्यामागचे मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते. हीच नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये मीठ मिसळून फरशी पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

सूर्याला अर्ध्य द्या

सूर्याला रोज अर्ध्य दिल्याने अर्थात जल अर्पण केल्याने कुंडलीत सूर्य ग्रह बलवान होऊ शकतो. सूर्य हा ग्रह समाजातील मान आणि उच्चपदाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले तर, घरात सुखसमृद्धी नांदते.

Chandra Grahan : चंद्र ग्रहण संपल्यानंतर तुम्ही हे उपाय केले का? ग्रहणाचे अशुभ प्रभाव दूर होतील

तुळशीची पूजा करा

दररोज तुळशीजींना अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमचे पठण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. यामुळे घरात आर्थिक सुबत्ता येते.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग