Vastu Remedy : वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष असल्यास आर्थिक चणचण भासते, वाद-विवाद वाढतात, नकारात्मकता वाढते, नात्यात दुरावा निर्माण होतो अशा अनेक अडचणी उद्भवतात. जर तुमची आर्थिक परिस्थिती फारच नाजुक असेल आणि खर्च वाढतच असतील, तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होत आहे. तर याला आपणच कारणीभुत असतो, आपल्याकडून नकळत काही चुका होतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यासंबंधी काही टिप्स आहेत. यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही, जाणून घ्या मुख्यदरवाजासंबंधी काय काळजी घ्यावी.
मुख्य दरवाजा स्वच्छ व चकाचक असायला हवा. मुख्य दरवाजासमोर कुठलाच केरकचरा जमा करू नये याची काळजी घ्यावी.
घराच्या मुख्य दरावाजाजवळ बुट-चप्पल काढू नये. तर बुट-चप्पलसाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे, याच दिशेला बुट व चप्पल काढावे. असे न केल्यास घरात नकारात्मकता वाढत जाते.
मुख्य दरवाजासमोर जर एखादा खांब असेल तर त्यावर आरसा लावून दिल्यास नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो.
लक्षात ठेवा तुमच्या मुख्य दरवाजातून कुठलाही आवाज येऊ देऊ नका, आवाज येत असल्यास लगेच तेल किंवा ऑईल टाका आणि दरवाजा सुधरवून घ्या.
घराच्या मुख्य दरवाजावर अंधार नसावा, सकाळी चांगला सूर्यप्रकाश येत आहे की नाही, तुमच्या दरवाजासमोर उजेळ आहे की नाही याची दक्षता घ्या.
घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाच आणखी दुसरा दरवाजा नाही पाहिजे.
जर तुमच्या मुख्य दरवाजासमोरच स्वयंपाकघर असेल तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर क्रिस्टलचा चेंडू लावावा.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ पुस्तकाचं कपाट असेल तर ते शुभ संकेत आहे परंतू लक्षात ठेवा की हे मुख्य दरवाजाच्या अगदी समोर नसायला हवं.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या