हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र यांना प्रचंड महत्व आहे. हिंदू धर्मातील लोक प्रत्येक शुभ कार्यात ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्राचा सल्ला अवश्य घेतात. मान्यतेनुसार हा सल्ला घेतल्यास शुभ कार्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा कोणतेही नुकसान होत नाही. तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणत्याही समस्येवर उपाय शोधायचा असेल, यामध्ये ज्योतिषशास्त्र खूप उपयुक्त ठरते. तर वास्तुशास्त्र तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी,आणि सुसंवाद वाढवते. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याची किंवा व्यवसाय काढण्याची योजना आखता तेव्हा वास्तुशास्त्र योग्य जागा निवडण्यास तुमची मदत करते. वास्तूशास्त्रात दिशा आणि ठिकाण अत्यंत महत्वाचे असतात.
आजच्या जगात बहुतांश लोक स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहतात. अनेक लोक आयुष्यभर बचत करुन किंवा कर्ज काढून व्यवसाय टाकतात. प्रचंड कष्ट करून आणि पैसा गुंतवूनसुद्धा अनेकांचा व्यवसाय हवा तसा चालत नाही. शिवाय काही काळाने बंद पडतो. अशावेळी ज्योतिष शास्त्राच्या मते तुमच्या व्यवसायात वास्तूदोष असू शकतो. त्यामुळे कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी एकदा वास्तूशास्त्राचा सल्ला घेण्याचे मार्गदर्शन ज्योतिष करतात. अशाने तुम्हाला आर्थिक नुकसानही होणार नाही आणि तुमचा व्यवसायसुद्धा उत्तमरित्या चालेल.
वास्तुशास्त्रात व्यवसायाबाबत अनेक महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. जेणेकरून तुमच्या व्यवसायात भरभराटी यावी. यामध्ये दिशा आणि जागेला महत्वाचे स्थान आहे. वास्तू शास्त्रानुसार, सिंहाभिमुख असलेली जमीन कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते. अशा प्रकारच्या जमिनीवर व्यवसाय केल्यास प्रगती होते. शिवाय व्यवसायात चांगला जम बसतो. समोर रुंद आणि मागे कमी असलेल्या जमिनीला सिंहाभिमुख जागा म्हटले जाते.
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक जागेचे एक महत्व असते. शिवाय प्रत्येक शुभ कार्यासाठी एक शुभ दिशा निश्चित केलेली असते. अशाप्रकारे व्यवसायासाठी सिंहाभिमुख जमिनीची निवड करण्याचा सल्ला शास्त्रात देण्यात आला आहे. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वार रुंद असल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तूमध्ये लक्ष्मी येते. शिवाय व्यवसायात आर्थिक भरभराटी व्हायला मदत होते. त्यामुळे शक्यतो अशीच जागा निवडावी.
त्याचबरोबर व्यवसायासाठी सिंहाभिमुख जागेची निवड केल्यास ग्राहकांना आकर्षित करण्यास यश मिळते. अशा जागेवर धन आकर्षित करण्याची क्षमता असते. कधीही व्यवसायात आर्थिक अडचणी येत नाहीत. त्यामुळे ज्योतिष नेहमीच व्यवसायासाठी अशा जागेची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. जेणेकरून तुम्हाला लाभ मिळावा.