प्रत्येकजण आपले घर नेहमी उत्साही, सकारात्मक, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण घर जितके आनंदी राहील तितकेच प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते. यामुळेच प्रत्येकजण आपल्या घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण घरामध्ये असे वातावरण तयार करणे खूप गरजेचे असते. यामुळे आपल्या मनाला आराम मिळतो, आनंद मिळतो.
पण जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा वावरत असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत घरातील नकारात्क ऊर्जा गायब करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणण्यासाठी वास्तू शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
घरात सात घोड्यांची पेंटिंग लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. हे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावावे. यासोबतच दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाचा फोटो लावल्याने नातेसंबंध मजबूत होतात आणि सकारात्मकताही वाढते.
वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही सुगंधित अगरबत्ती-धूप जाळू शकता. असे केल्याने चांगली झोप लागते आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहते. चंदन किंवा लोबान अगरबत्ती वापरणे चांगले मानले जाते.
घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घोड्याची नाल लावली तर ते तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर ठेवेल. वास्तूनुसार घोड्याचा नाल घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी. काळ्या घोड्याचा नाल घालणे अधिक शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या घरात आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)