प्रत्येक व्यक्तीला आपले घर अतिशय सुंदर आणि टापटीप असावे अशी इच्छा असते. घर लहान असो किंवा मोठे ते अगदी नीटनेटके असावे इतकीच अपेक्षा असते. स्त्रिया सतत घरामध्ये सफाई करत असतात. बहुतांश लोकांना घरामध्ये धूळ,जळमट अशा गोष्टी सहन होत नाहीत. असे लोक मिळेल त्या वेळी घरात स्वच्छता करत असतात. महत्वाचे म्हणजे घरातील स्त्रिया कोणत्याही वस्तू वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक वस्तूंचा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी सदुपयोग अवश्य करतात. आणि ते योग्यसुद्धा असते. मात्र ही सवय काही बाबतीत नुकसानदायक ठरु शकते. त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्टीच्या वापरामागे वास्तूशास्त्राचे काय नियम आहे हे पाहणे गरजेचे असते.
घरामध्ये बऱ्याच स्त्रिया घर साफ करताना जुने कपडे वापरतात. आपल्याच मुलांनी, पतीने, ज्येष्ठ व्यक्तींनी वापरलेली किंवा आपण स्वतः वापरलेले कपडे सफाईसाठी वापरले जातात. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार हे अत्यंत चूक आहे. घर सफाई करताना जुने किंवा फाटके कपडे वापरल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्री वास करते. त्यामुळे वास्तूशास्त्र सांगते की महिलांनी किंवा पुरुषांनी घरात सफाई करताना जुने कपडे वापरले जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.
बऱ्याचदा लहान मुलांचे फाटलेले किंवा त्यांना लहान झालेले कपडे आपण साठवून ठेवतो. आणि घरात साफसफाई करताना त्या कपड्यांचा वापर करतो. परंतु वास्तू शास्त्रानुसार असे करणे अत्यंत चुकीचे असते. लहान मुलांचे कपडे साफसफाईसाठी वापरल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो असे करणे टाळावे.
घरामध्ये अनेकवेळासाफसफाई करण्यासाठी आपण जुने झालेले किंवा फाटलेले अंतर्वस्त्र हमखास वापरतो. अनेकजण या कपड्यांनी आपल्या कार, किंवा बाईकची सफाई करतात. परंतु वास्तू शास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. उत्साह आणि आनंद नाहीसा होतो. आळशीपणा, कामाचा वेग मंदावने असे नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
घरात बऱ्याच वेळा वृद्ध व्यक्ती असतात. त्यांचे फाटलेले कपडे घरात साफ सफाई करण्यासाठी वापरले जातात. मात्र असे केल्याने घरात सुखसमृद्धी राहत नाही. घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुखसमृद्धी राहण्यासाठी वास्तू शास्त्रात सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या