Vastu Tips For Money : सध्या प्रत्येकाला सुख-सुविधांनी भरलेले जीवन जगायचे आहे. सुख-सुविधांना भरलेले जीवन जगण्यासाठी पैसा हा काळाची गरज असल्यासारखा आहे. परंतू या पैश्यात घराचे इतर खर्च, संततीला लागणारा खर्च, चैनीच्या वस्तूंवर लागणारा खर्च असे अनेक खर्च येतात. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम करतो. परंतू अनेक वेळा काही लोकांना यश मिळते, तर काहींना कठोर परिश्रम करूनही आर्थिक संकटावर मात करता येत नाही.
काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं. पण तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरातदेखील काही वास्तूबदल करावे लागतात. घरामध्ये सुखशांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपला स्वभाव, तडजोड या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्यासह आपल्याला साथ हवी असते ती वास्तूदोष हटवण्याची.
प्रत्येकजण वास्तुशास्त्रात सांगतो की घरात काही वस्तू आणल्याने आर्थिक संकट दूर होते आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर ही दिशा अधिक उर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास, आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तींचा विकास होतो. जाणून घ्या घरात ठेवलेल्या कोणत्या वस्तू सकारात्मक ऊर्जा आणतात.
घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो फ्रेम ठेवणे खूप शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार विघ्नहर्ताच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. वास्तू दोषांपासूनही आराम मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये श्रीफळ, नारळ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात नारळ ठेवणे खूप शुभ असते. नारळ ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते असे म्हणतात. जीवनात आनंद येतो. ज्योतिषाच्या सल्याने हे नारळ विधीपूर्वक ठेवावे.
घराच्या मंदिरात शंख ठेवणे खूप शुभ असते असे वास्तुशास्त्र सांगते. शंख ठेवल्याने घरात सकारात्मकता येते. शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो.
वास्तू सांगते की आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी मातेचा आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा चित्र लावावे. असे मानले जाते की माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या कृपेने जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.