भारतीय भोजनपद्धती जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. भारतीय खाद्यपदार्थ, मसाले तर प्रसिद्ध आहेतच. शिवाय आपल्या भोजनाची पद्धतदेखील तितकीच लोकप्रिय आहे. देशात भोजनाला पूर्णब्रह्म म्हटले जाते. इतर देशात हाताचा वापर न करता चमच्याने खाणे, मांडी घालून न बसता डायनिंग टेबलचा वापर करणे. असे बदल पाहायला मिळतात. असे बदल आता आधुनिक काळात आपल्या देशातसुद्धा पाहायला मिळतात. मात्र आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार मांडी घालून जमिनीवर बसून हाताचा वापर करुन जेवण केले जाते. अन्नाचा आणि ताटाचा अपमान करणे आपल्या संस्कृतीत दुर्भाग्याचे लक्षण समजले जाते.
अन्न किंवा ताटाचा अपमान केल्यास आपल्या कुटुंबात-आयुष्यात दारिद्र्य येते असे मानले जाते. त्यामुळेच पूर्वजांनी भोजनाच्या काही पद्धती सांगितल्या आहेत. जेवणाआधी “वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे…” हे आपण आपल्या बालपणी शाळेतच शिकलो आहोत. शिवाय जेवणाच्या नियमामध्ये असेही सांगण्यात आले आहे की, जेवणानंतर त्याच ताटात हात धुणे हे अत्यंत चुकीचे असते. असे केल्याने आपल्याला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
ज्योतिष शास्त्रानुसार जेवलेल्या ताटातच हात धुतल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे तुम्हाला अनावश्यक आणि प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा तुमच्या खर्चाचे डोंगर इतके वाढते की, तुम्ही कर्जबाजारी होता. या गोष्टींपासून वाचण्यासाठी जेवलेल्या ताटात हात धुणे टाळा.
वैदिक शास्त्रानुसार, जेवलेल्या ताटात हात धुतल्याने अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नाराज होते आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक अडचणींचा सामनादेखील करावा लागू शकतो. पोटासंबंधी अनेक तक्रारी तुम्हाला जाणवू लागतात. शिवाय देवी लक्ष्मीसुद्धा नाराज होऊन निघून जाते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण भासू लागते. हळूहळू घरामध्ये दारिद्र्य यायला सुरुवात होते. त्यामुळे भोजन केल्यानंतर त्याच ताटात हात धुण्याची सवय बदलायला हवी.
याशिवाय आपल्या घरातील मोठी लोकं सांगतात अंथरुणात बसून जेवण करू नको, तसे करणेसुद्धा वैदिक शास्त्रानुसार अशुभ असते. अंथरुणात बसून जेवण केल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवाय विविध रोग मागे लागतात. आरोग्याच्या असंख्य तक्रारी उद्भवतात. इतकेच नव्हे तर हातातील पैसा जाऊन दारिद्र्य येते. त्यामुळे कधीच अंथरुणात बसून जेवण करु नये. अशाने अन्नाचा अपमान होऊन अन्नपूर्णा देवीही नाराज होते.
संबंधित बातम्या