मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असाव्या या ७ गोष्टी; सदैव राहील लक्ष्मीची कृपा

Vastu Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असाव्या या ७ गोष्टी; सदैव राहील लक्ष्मीची कृपा

Jun 17, 2024 05:31 PM IST

How to attract Goddess Lakshmi at house : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. मुख्य दरवाजावर काही वस्तू ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो आणि धन-धान्यातही वृद्धी होते. जाणून घ्या या कोणत्या वस्तू आहे.

वास्तू उपाय, वास्तुशास्त्र
वास्तू उपाय, वास्तुशास्त्र

How to attract Goddess Lakshmi at house : घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा केंद्र मानला जातो. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. घरामध्ये चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने किंवा बनवल्याने वास्तू दोष निर्माण होतात. घराच्या मुख्य दारावर काही वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी वास करते आणि धन-संपत्तीची वृद्धी देखील होते. चला जाणून घेऊया घराच्या प्रवेशद्वारावर कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे घरात लक्ष्मी वास करेल-

स्वस्तिक चिन्ह- 

हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

ट्रेंडिंग न्यूज

घोड्याची नाल- 

घोड्याची नाल घरासाठी खूप लकी मानली जाते. घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते. यामुळे सुख-संपत्तीत वृद्धी होते व नशीब चमकते.

तोरण लावा - 

आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि प्रवेशद्वाराजवळ लावा. लक्षात ठेवा की या तोरणात वापरलेली पाने व फुले हिरवी असावी आणि ती तुटली जाऊ नये. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते.

शुभ लाभ चे चिन्ह- 

घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या-डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा. किंवा शुभ-लाभ लिहीलेले चिन्ह चिटकवा. यामुळे चांगला नफा होतो. हे सौभाग्याचे प्रतीक आहे. असे लिहिल्याने घरातील सुख-समृद्धीत वृद्धी होते.

दिवा लावा- 

दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते.

तुळशीचे रोप- 

तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप देखील ठेवू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की हे रोप कोरडे किंवा खराब झालेले असू नये. सकाळ संध्याकाळ तुळशीच्या समोर दिवा लावावा.

सूर्य यंत्र : 

घराच्या मुख्य दरवाजावर सूर्य यंत्र स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. याच्या मदतीने घराला वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक ऊर्जेपासून वाचवता येते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. 

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

WhatsApp channel