Vastu Tips : संध्याकाळनंतर चुकूनही करू नका ही ५ कामं; माता लक्ष्मीची अवकृपा अन् धनसंपत्तीची हानी होईल!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : संध्याकाळनंतर चुकूनही करू नका ही ५ कामं; माता लक्ष्मीची अवकृपा अन् धनसंपत्तीची हानी होईल!

Vastu Tips : संध्याकाळनंतर चुकूनही करू नका ही ५ कामं; माता लक्ष्मीची अवकृपा अन् धनसंपत्तीची हानी होईल!

Updated Aug 26, 2024 01:16 PM IST

Vastu Tips : अशी काही कामे आहेत जी चुकीच्या वेळी केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी संध्याकाळी या गोष्टी करणे टाळा.

वास्तुशास्त्र, वास्तू टिप्स
वास्तुशास्त्र, वास्तू टिप्स

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. रोजच्या जीवनात ताण-तणाव, वाद होतच असतात आणि अडचणीही येतच राहतात, यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो. मात्र, घराची रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवणही कधी-कधी त्यास कारणीभूत ठरते, असं मानलं जातं. 

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी काही काम करणे योग्य मानले जात नाही. घरात ठेवलेल्या वस्तूंमुळे घराच्या ऊर्जेवरही परिणाम होतो. अशी काही कामे आहेत जी चुकीच्या वेळी केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते आणि अडचणीही वाढतात. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आनंदाचे वातावरण राखण्यासाठी संध्याकाळी काही काम करणे टाळा.

तुळशीची पाने तोडणे- 

तुळशी मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्याने किंवा त्याची पाने तोडल्याने घरामध्ये दरिद्रता येते असे म्हणतात. त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता टिकून राहण्यासाठी संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करू नका, तुळशीची पाने तोडू नका किंवा तिला स्पर्श करू नका.

अंधार करू नका, दिवा-बत्ती करा- 

धार्मिक मान्यतांनुसार असे मानले जाते की, देवी-देवता संध्याकाळी फिरत असतात. त्यामुळे सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार नसावा हे लक्षात ठेवा. संध्याकाळी अंधार पडल्याने घरातील सुख-समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो.

वाद-विवाद टाळा- 

बहुतेक लोक संध्याकाळी भजन-कीर्तन आणि पूजा करतात. हिंदू धर्मात सायंकाळी दिवे लागणीची वेळ असते त्यामुळे पूजा-पाठ करण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत संध्याकाळी भांडण करणे टाळावे. यामुळे घरातील नकारात्मकता लक्षणीयरीत्या वाढते.

पैसे उधार देऊ नका- 

वास्तुविद्येनुसार संध्याकाळच्या वेळी पैशाचे व्यवहार करणे चांगले नाही. विशेषत: या वेळी, एखाद्याने अगदी लहान रक्कम देखील कोणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊ पण नये. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घेतलेले पैसे किंवा कर्ज कधीही फेडले जात नाही.

झाडू मारू नये - 

सूर्यास्तानंतर घर किंवा आजूबाजूच्या परिसरात झाडू नये. असे मानले जाते की संध्याकाळी लक्ष्मी येते त्यामुळे जर आपण या वेळेत झाडू लावल्यास लक्ष्मी देवी निघुन जाते, कोपते आणि धनहानी होते.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner