Vastu Tips : ऑफीस आणि घरात या गोष्टी चुकूनही ठेऊ नका, हाती आलेला पैसा चालला जाईल!-vastu remedy for office and home do not keep these things they have a bad effect ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : ऑफीस आणि घरात या गोष्टी चुकूनही ठेऊ नका, हाती आलेला पैसा चालला जाईल!

Vastu Tips : ऑफीस आणि घरात या गोष्टी चुकूनही ठेऊ नका, हाती आलेला पैसा चालला जाईल!

Sep 09, 2024 12:54 PM IST

Vastu Tips For Office And Home : ऑफिसमध्ये चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या दिशेने गोष्टी ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रसार वाढतो. त्यामुळे तुमच्या ऑफिस आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

वास्तू उपाय ऑफीस आणि घरासंबंधीत
वास्तू उपाय ऑफीस आणि घरासंबंधीत

Vastu For Office And Home : वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफीस आणि आपल्या अवतीभोवतीच्या सर्वच गोष्टींची योग्य प्रकारे मांडणी केलेली असल्यास वास्तू दोष दूर होतो. वास्तू दोष नसला तर व्यक्तीला यश मिळण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. दिशेसंबंधीत असो किंवा इतर नियम असो वास्तुशास्त्रात हे महत्वाचे आहे कारण आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरल्यास आपण दुखी आणि कष्टी होतो. वास्तू दोष असल्यास व्यक्तीच्या वाट्याला अनेक अडचणी येतात. त्यामुळे घर असो की ऑफीस असो एखादी गोष्ट कुठे आणि कशी ठेवावी, तीची योग्य प्रकारे मांडणी कशी करावी यासंबंधीत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन केलेले आहे.

वस्तूंच्या देखभालीबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम दिलेले आहेत. अनेक वेळा घर किंवा ऑफिसमध्ये चुकीच्या गोष्टी किंवा वस्तू चुकीच्या दिशेने ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह हा वाढतच जातो. त्यामुळे तुमच्या ऑफिस आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत-

घर आणि ऑफीससंबंधीत वास्तू उपाय

ऑफिस किंवा घरातील बल्ब किंवा लाईटमध्ये बिघाड झाला असेल तर सर्वप्रथम तो बदलायला हवा. असे न केल्याने तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि कुटुंबात कलह निर्माण होईल.

घर आणि ऑफिसमध्ये काटेरी फुले आणि झाडे लावू नयेत. असे केल्याने वातावरणात अशांतता निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा अडथळा संभवतो.

ऑफिस किंवा घरात जमा झालेला कचरा कधीही ठेवू नका. यामुळे घरातील शांतता बिघडते आणि नकारात्मक ऊर्जाही पसरते.

तुमच्या ऑफिस किंवा घरात काही तुटलेली काच असेल तर ती आधी काढून टाकावी. तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव राहतो.

तुमच्या ऑफिस किंवा घरातील कोणतीही मूर्ती किंवा फोटो तडा गेला असेल किंवा फाटला असेल तर सर्वप्रथम तो बदलून टाकावा. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

घर किंवा ऑफिसमध्ये कधीही बंद घड्याळ लावू नये. बंद घड्याळ लावल्याने नकारात्मकता पसरते. त्याचबरोबर मनगटावरही बंद घड्याळ घालू नये. असे म्हणतात की, थांबलेले घड्याळ वापरल्याने अडचणी उद्भवतात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग