प्रत्येक पालकांना आपली मुले नेहमीच निरोगी आणि सदृढ राहावी अशी अपेक्षा असते. नवीन पालकांना तर आपल्या नवजात बाळांची प्रचंड काळजी असते. लहान मुलांना नेमका काय त्रास होतो हे पटकन लक्षात येत नाही. बहुतांश वेळा सर्वकाही ठीक असूनसुद्धा बाळाची तब्येत सतत बिघडते. आपल्या मुलांचा त्रास पाहून पालकांना सुद्धा वेदना होऊ लागतात. अनेकवेळा डॉक्टरांना दाखवून सल्ला घेऊनसुद्धा बाळाचे आरोग्य बिघडत असते. अशा स्थितीत ज्योतिष अभ्यासानुसार तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असण्याची शक्यता असते. वास्तूदोषसुद्धा तुमच्या बाळाचे आरोग्य बिघडण्याचे कारण असू शकते. अशावेळी ज्योतिषांचा सल्ला घेणे आणि वास्तूदोष दूर करणे लाभदायक ठरते.
एखाद्या घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही. प्रचंड कष्ट करूनसुद्धा आर्थिक प्रगती होत नाही. अशावेळी त्यांच्या घरात वास्तुदोष असू शकतो. वास्तुदोष म्हणजे घरातील वस्तू, खोल्या, शौचालय, दरवाजे, खिडक्या चुकीच्या दिशेला असणे. वास्तुशास्त्रात योग्य वस्तू योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. अथवा वास्तुदोष निर्माण होतो. आणि त्यामुळेच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते. आपली मुले सतत आजारी पडत असतील तर यामागेसुद्धा वास्तुदोष असण्याची दाट शक्यता आहे.
वास्तू शास्त्रानुसार, तुमच्याही बाळाची तब्येत सतत बिघडत असेल, तर त्यामागे लोखंडी पलंग हेदेखील एक महत्वाचे कारण असू शकते. शास्त्रानुसार नवजात बाळांसाठी लोखंडी पलंग कधीही वापरू नये. तुमच्या बाळासाठी नेहमी लाकडी पलंगाचा वापर करा. शिवाय बाळाच्या पलंगावर काळ्या रंगाची चादर अथवा बेडशीट अंथरणे टाळा. याचासुद्धा बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काळ्या रंगाने बाळाजवळ नकारात्मक ऊर्जा वास करते. आणि त्यातून त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतात.
वास्तू शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेलाच असायला हवी. विशेष म्हणजे घरात शौचालय बांधताना ते योग्य दिशेत आहे का याची खात्री करुन घ्यावी. शौचालय चुकीच्या दिशेत असेल, तर त्यातून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. याचा तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचे बाळ सतत आजारी पडण्यामागे हेसुद्धा एक कारण असू शकते. घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला शौचालय असणे अतिशय अशुभ समजले जाते. जर तुमच्याही घरात चुकीच्या दिशेला शौचालय असेल तर शौचालयात मीठ किंवा तुरटी अवश्य ठेवा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते.
तुम्ही राहत असलेल्या घरात लक्ष्मी वास करते त्यामुळे घरात स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात नेहमीच देवी लक्ष्मीचा वास असतो. परंतु बहुतांश वेळा घरातील अशी काही ठिकाणे असतात ज्याठिकाणी अनेक दिवस स्वच्छता केली जात नाही. त्याठिकाणी धूळ आणि अस्वच्छता असते. अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वास करते. शिवाय मुलांसाठी पश्चिम दिशा शुभ समजली जाते. त्यामुळे या दिशेला कधीही अस्वच्छता ठेऊ नका. वास्तूशास्त्राप्रमाणे या गोष्टींवर लक्ष दिल्यास तुमच्या बाळाचे आरोग्य सुधारू शकते.
संबंधित बातम्या