Vasant Panchami Shubhechha : धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्माजीच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रकट झाली आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला. हा खास दिवस म्हणजे सरस्वती पूजनाचा म्हणजेच वसंत पंचमीचा होय.
दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख रविवार २ फेब्रुवारी रोजी आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने आणि मंत्रांचा जप केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते. तसेच या दिवशी वसंत ऋतु सुरू होतो. वसंत ऋतूच्या प्रारंभात आणि सरस्वती देवीच्या स्मरणात या दिवसाला आणखी खास करण्यासाठी तुमच्या प्रियजनांना वसंत पंचमीच्या या शुभेच्छा पाठवा.
ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर होवो,
हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वतीदेवी चरणी प्रार्थना !
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां।
सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।
वसंत पंचमी व सरस्वती देवी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा
…
वसंत ऋतूची मंद झुळूक नवीन संधी घेऊन येवो आणि
देवी सरस्वतीचे आशीर्वाद तुम्हाला यशाच्या दिशेने मार्गदर्शन करो
वसंत पंचमीच्या खूप खूप खूप शुभेच्छा
…
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
वसंत पंचमीच्या निमित्ताने
ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
आपणा सर्वांना देवी सरस्वतीची कृपा लाभावी
सर्वाना वसंत पंचमीची हार्दिक शुभेच्छा
…
वसंत पंचमीच्या या शुभ प्रसंगी
तुमचे हृदय देवी सरस्वतीच्या दिव्य ज्ञानाने भरून जावो.
तुम्हाला वसंत पंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
…
सरस्वती देवी तुमच्या जीवनात
ज्ञान, किरण, संगीत,
सुख, शांति, धन-संपत्ती,
समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
…
वसंत पंचमीच्या या शुभ दिवशी,
तुमच्या जीवनातील राग वीणा संगीताप्रमाणे मधुर होवो.
तुम्हाला आनंद आणि यश मिळो
वसंत पंचमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
…
वसंत ऋतूचे आगमन
तुमच्या आयुष्यात नवीन आशा,
नवीन आकांक्षा आणि
नवीन सुरुवात घेऊन येवो.
वसंत पंचमीच्या शुभेच्छा!
…
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे।
वसत्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्या प्रदाभव।।
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या