दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख बुधवार १४ फेब्रुवारी रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्माजीच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रकट झाली आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने आणि मंत्रांचा जप केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते. तसेच या दिवशी वसंत ऋतु सुरू होतो. वसंत ऋतूच्या प्रारंभात आणि सरस्वती देवीच्या स्मरणात या दिवसाला आणखी खास करण्यासाठी या शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणास लाभो;
वसंत पंचमीच्या शुभेच्छा!
…
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे।
वसत्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्या प्रदाभव।।
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
हा वसंत ऋतू अनंत प्रेम व आनंद भरो
जीवनात उत्साहाची आणि कसलीही कमतरता ना राहो
हीच निसर्गाला हाक व सरस्वती देवीला प्रार्थना
वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
…
विद्या: समस्तास्तव देवि भेदा: स्त्रिय: समस्ता: सकला जगत्सु।
त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुति: स्तव्यपरा परोक्ति:।।
वसंत पंचमीच्या मंगलमय शुभेच्छा
…
ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी
तुमच्या जीवनात संगीत, सुख-शांति,
धन-संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता असावी
वसंत पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
…
ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां।
सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।
वसंत पंचमी व सरस्वती देवी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा
…
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
जीवनाचा हा वसंत ऋतू अनंत प्रेमाचा आनंद देवो
आणि आयुष्य उत्साहाने भरून जावो,
अडचणींचा विनाश होवो
वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
…
संबंधित बातम्या