वसंत पंचमीच्या दिवशी करा हे काम, पैशांचा लाभ होईल, आयुष्यातील वाईट दिवसं नष्ट होतील
मराठी बातम्या  /  धर्म  /  वसंत पंचमीच्या दिवशी करा हे काम, पैशांचा लाभ होईल, आयुष्यातील वाईट दिवसं नष्ट होतील

वसंत पंचमीच्या दिवशी करा हे काम, पैशांचा लाभ होईल, आयुष्यातील वाईट दिवसं नष्ट होतील

Feb 02, 2024 04:37 PM IST

Vasant Panchami 2024 : वसंत पंचमीचा दिवस संगीत, कला आणि ज्ञानाची देवी असलेल्या माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी, लोक देवीची विशेष पूजा करतात. अभ्यासात आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सरस्वतीकडे आशीर्वाद मागतात.

Vasant Panchami 2024
Vasant Panchami 2024

Vasant Panchami : देशभरात दरवर्षी वसंत पंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे. असे मानले जाते की समर्पण आणि भक्तीने सरस्वतीची प्रार्थना केल्याने ती जीवनातील अंधार दूर करते.

माता सरस्वती ही कला, तंत्रज्ञान, संगीत आणि नृत्याचीही देवी आहे, ज्यांना या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्यांनी सरस्वती मातेची प्रार्थना करावी. यंदा सरस्वती पूजन १४ फेब्रुवारीला होणार आहे.

सरस्वती पूजनाच्या दिवशी हे काम करा

देवी सरस्वतीची पूजा

वसंत पंचमीचा दिवस संगीत, कला आणि ज्ञानाची देवी असलेल्या माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी, लोक देवीची विशेष पूजा करतात. अभ्यासात आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सरस्वतीकडे आशीर्वाद मागतात.

अक्षर सराव

सरस्वती पूजनाचा दिवस शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लहान मुले केशरात बुडवलेल्या पेनने किंवा खडूने कागदावर पहिली अक्षरं लिहितात.

वसंत पंचमीला लोक पिवळे कपडे परिधान करतात

वसंत पंचमीला लोक पिवळे कपडे परिधान करतात. कारण पिवळा रंग वसंत ऋतु आणि माता सरस्वतीशी संबंधित आहे.

 वसंत पंचमीच्या दिवशी पतंग उडवतात

वसंत पंचमीच्या दिवशी पतंग उडवणे ही प्रचलित परंपरा आहे. या काळात सर्व वयोगटातील लोक विविध रंगांचे आणि आकारांचे पतंग उडवतात, जे ज्ञान आणि आकांक्षांच्या उड्डाणाचे प्रतीक आहे.

वसंत पंचमीला पिवळी फुलं अर्पण करावीत

वसंत पंचमीला माता सरस्वतीला झेंडू आणि सूर्यफुलाची फुलं अर्पण करावीत. असे केल्याने ज्ञानदेवतेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner