मराठी बातम्या  /  religion  /  Vasant Panchami 2023 : वसंत पंचमीच्या निमित्तानं करा या वस्तू दान, होईल माता सरस्वतीची कृपा
माता सरस्वती
माता सरस्वती (हिंदुस्तान टाइम्स)

Vasant Panchami 2023 : वसंत पंचमीच्या निमित्तानं करा या वस्तू दान, होईल माता सरस्वतीची कृपा

23 January 2023, 10:43 ISTDilip Ramchandra Vaze

Importance Of Daan On Vasant Panchami : ऋतूंचा राजा, वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते.

ऋतूंचा राजा, वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीचा दिवस हंसवाहिनीला समर्पित आहे. या दिवशी ब्रह्मदेवामुळे माता सरस्वतीचा जन्म झाला असे म्हटले जाते, म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते.वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई आणि पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. एवढेच नाही तर वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दान करावीत. वसंत पंचमीला दान करणे फार फलदायी असते असे म्हणतात.

ट्रेंडिंग न्यूज

विद्यार्थ्यांना वह्या, पेन इत्यादी दान करा

वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना त्यांच्या अभ्यासाच्या उपयुक्त वस्तू दान कराव्यात. हा उपाय केल्याने माता सरस्वतीची कृपा प्राप्त होते.

पिवळ्या मिठाईचे दान

मान्यतेनुसार माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई खूप प्रिय असते. सरस्वती मातेची पूजा करताना तिला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केली जाते. या दिवशी गरजूंना पिवळी मिठाई दिल्याने माता सरस्वती प्रसन्न होऊन ज्ञानाचे वरदान देते.

वसंत पंचमीला वस्त्र दान करा

वसंत पंचमीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने माता सरस्वती आपल्या भक्तांना यशाचा आशीर्वाद देते आणि सुख-समृद्धी टिकवून ठेवते.

वेदांचे दान

ब्राह्मणांना वेदशास्त्रांचे दान केल्याने माता सरस्वती खूप प्रसन्न होतात आणि मुलांना ज्ञान आणि बुद्धीचे वरदान देतात, असे म्हटले जाते. जर विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असेल तर त्याने ब्राह्मणांना वेदशास्त्र दान करावे.

मुलींना पांढरे वस्त्र दान करा.

वसंत पंचमीच्या दिवशी ब्राह्मण मुलीला पांढरे वस्त्र दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि माता सरस्वतीची कृपा सदैव राहते.

विभाग