Varuthini Ekadashi 2024 : हिंदू धर्मात आपण विविध, सण,व्रत वैकल्ये साजरे करत असतो. हिंदू धर्म इतका समृद्ध आहे त्यामुळेच प्रत्येक महिन्यात आपल्याला एक किंवा अधिक सण पाहायला मिळतच असतात. यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे एकादशी होय.
प्रत्येक महिन्यात दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात. त्यातील एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात येते. विष्णू देवासाठी एकादशी अतिशय प्रिय असते. त्यामुळेच एकादशी दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला वरूथिनी एकादशी असे संबोधले जाते. येत्या ४ मे रोजी म्हणजेच उद्या वरुथिनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या एकादशी दिवशी विष्णू देवाची वामन रुपात पूजा बांधण्यात येते. या दिवशी व्रत वैकल्ये आणि पूजापाठ केल्याने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
प्राचीन काळात नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा एक राजा वास्तव्यास होता. राजा म्हणून ज्या जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण करून ते पूजापाठ व्रत वैकल्येसुद्धा निष्ठेने करत होते.तसेच जनतेसाठी त्यांच्या मनात दयाळू वृत्ती होती. एके दिवशी राजा तपस्या करत बसले होते, अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ओढत जंगलाच्या दिशेने नेले. त्यावेळी राजाने विष्णू देवाची पूजा केली. या आपल्या भक्ताची हाक ऐकून विष्णू देव प्रकट झाले. त्यांनी अस्वलाचा वध केला आणि राजाला जीवदान दिले. परंतु या हल्ल्यात अस्वलाने राजाचा पाय तोडून खाल्ला होता. हे दृश्य पाहून राजाला अतिशय दुःख झाले. यावेळी विष्णू देवाने राजाला सांगितले की, हे तुझ्या गत जन्माचे पाप आहे. त्याची शिक्षा या स्वरूपात तुला आता भोगावी लागली. यावर राजाने देवाला याबाबत काही उपाय आहे का अशी विचारणा केली. त्यावर विष्णू देवाने सांगितले की, या पापातुन मुक्त होण्यासाठी तुला वरुथिनी एकादशी दिवशी माझी वराह रूपातील पूजा बांधावी लागेल. असे केल्याने तुझे पाप तर धुवून जातीलच शिवाय तुझा शरीरराचे अवयव नव्याने निर्माण होतील. अशा प्रकारे राजाने हा उपवास केला आणि त्याला आपला पाय परत मिळाला.
संबंधित बातम्या