Valmiki Jayanti Wishes and Quotes 2024 : वाल्मिकी जयंती दरवर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी वाल्मिकी जयंती आज १७ ऑक्टोबर २०२४, गुरुवारी आहे. हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. महर्षि वाल्मिकी यांच्या जन्माबाबत अद्याप कोणताही स्पष्ट पुरावा नाही परंतु असे म्हटले जाते की त्यांचा जन्म महर्षी कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्यांची पत्नी चारशिनी यांच्या पोटी झाला.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान श्रीरामांनी माता सीतेचा त्याग केला तेव्हा ती महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात अनेक वर्षे राहिली. येथेच माता सीतेने लव आणि कुश यांना जन्म दिला. या निवडक संदेशांद्वारे तुम्ही महाकाव्य लेखक, गुरु आणि संत ऋषी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि नातेवाइकांना शुभेच्छा पाठवू शकतात.
गुरु आहे महान
गुरु देतात ज्ञान
वाल्मिकी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर
चला करूया गुरूंना वंदन
वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
गुरु, संत आणि कवी वाल्मिकी यांनी ज्ञानाची गंगा वाहिली आहे
चला सर्व मिळून यातून प्रेरणा घेऊया
वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
तुम्हाला महर्षी वाल्मिकी यांच्याकडून ज्ञान मिळो
माता लक्ष्मीकडून धन आणि धान्य मिळो
प्रभू रामाकडून तुम्हाला सुख, शांती आणि प्रगती मिळो
वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले
वाल्मिकी जयंतीला आपण सर्व मिळून त्यांना वंदन करूया
वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा
…
महाकाव्य ज्ञान तुम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
वाल्मिकी जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
या वाल्मिकी जयंतीनिमित्त
महान ऋषींचे आणि त्यांच्या काळातीत
शिकवणुकीचे स्मरण करूया
रामायण वाचून आणि त्यावर चिंतन करून
महर्षी वाल्मिकींचा जन्म साजरा करूया
वाल्मिकी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
मायेचे दोन प्रकार आहेत - अविद्या आणि विद्या - महर्षि वाल्मिकी
माता आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ - महर्षि वाल्मिकी
आपल्यातील देवत्वाचा शोध घेणे हे जीवनाचे खरे सार आहे. - महर्षी वाल्मिकी
धार्मिकतेचा मार्ग बऱ्याचदा कठीण असतो, परंतु तो एकमेव मार्ग आहे जो तुडवण्यासारखा आहे. - महर्षी वाल्मिकी
रामायणात, आपल्याला केवळ कथाच नाही, तर सद्गुण आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक सापडतो. - महर्षी वाल्मिकी