Vastu Tips On Valentine day : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. कारण याच महिन्यात प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तरुणांमध्ये हा दिवस अधिक लोकप्रिय आहे. फेब्रुवारी महिन्यात लोक वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात आणि आपल्या जोडीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात.
अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन डेसाठी वास्तुशास्त्रातही काही टिप्स देण्यात आल्या आहेत. या टीप्सचे पालन केल्यास तुमचे प्रेमसंबंध अधिक चांगले आणि मजबूत होऊ शकतात.
आपण या ठिकाणी जोडीदाराकडून मिळालेले गिफ्ट घरात कोणत्या दिशेला ठेवावे, याबाबत जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पार्टनरने दिलेले गिफ्ट एका विशिष्ट दिशेला ठेवल्यास तुमच्या नात्यात प्रेम वाढण्याची शक्यता अधिक असते आणि नाते अधिक मजबूत बनते.
ज्या लोकांना आपलं नातं मजबूत आणि गोड ठेवायचं आहे, त्यांनी जोडीदाराकडून मिळालेलं गिफ्ट घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमची लव्हलाईफ आणखी सुधारेल. तसेच वैवाहिक जीवन यशस्वी होईल.
ज्यांना आपल्या नात्याला प्रत्येक वाईट नजरेपासून वाचवायचे आहे, त्यांनी या खास दिवशी मिळालेल्या भेटवस्तू घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवाव्यात. हा उपाय केल्यास प्रेम जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तसेच नात्यात प्रेम वाढेल.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीकडून मिळालेली भेटवस्तू घराच्या पश्चिम दिशेला ठेवा. कारण ही दिशा धनाच्या देवीची दिशा मानली जाते. त्यामुळे जोडीदाराकडून मिळणाऱ्या भेटवस्तू या दिशेला ठेवा. असे केल्याने नात्यात गोडवा कायम राहील. तसेच वैवाहिक जीवनातील समस्याही संपुष्टात येतील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)