मराठी बातम्या  /  धर्म  /  Vaisakha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमा अन् वैशाख पौर्णिमेच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा

Vaisakha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमा अन् वैशाख पौर्णिमेच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा

May 23, 2024 08:29 AM IST

Vaisakha Purnima 2024: या अतिशय पवित्र दिवशी मांस आणि मसालेदार अन्न टाळण्यापासून ते गौतम बुद्धांच्या उपदेशाची आठवण ठेवण्यापर्यंत, अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

बुद्ध पौर्णिमा अन् वैशाख पौर्णिमेच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा
बुद्ध पौर्णिमा अन् वैशाख पौर्णिमेच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करू नये? वाचा (HT Photo)

Vaisakha Purnima 2024: वैशाख पौर्णिमा हा वर्षातील शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमा देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार वैशाख पौर्णिमा ही वर्षातील दुसरी मोठी पौर्णिमा मानली जाते. नृसिंह जयंतीनंतर लगेच वैशाख पौर्णिमा येते. वैशाख पौर्णिमा अत्यंत शुभ मानण्याचे मुख्य कारण म्हणजे बुद्ध पौर्णिमा देखील याच दिवशी येते. असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती आहे. पौराणिक कथेनुसार, या शुभ दिवशी सिद्धार्थ गौतमला बोधगयेतील शुभ बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. जीवनाचा अर्थ आणि सर्व दुःखांचे मूळ शोधण्यासाठी दीर्घ आणि सखोल चिंतनानंतर त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Chaturmas 2024 : या तारखेपासून सर्व शुभ कार्य थांबतील, जाणून घ्या चातुर्मास कधी सुरू होतोय

या दिवशी सत्यनारायणाची पूजाही केली जाते. भगवान सत्यनारायण हे भगवान विष्णूचे परोपकारी अवतार मानले जातात. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त देवाच्या मूर्तीची पूजा करतात आणि सत्यनारायण व्रत पाळतात. बौद्ध धर्माचे अनुयायी गौतम बुद्धांच्या जीवनातील धड्यांबद्दल सर्वांना माहिती देतात. तर, मिरवणुका काढून आणि पूजा करून दिवस साजरा करतात. यावर्षी २३ मे रोजी वैशाख पौर्णिमा साजरी होणार आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी तयारी करत असताना, अशा काही गोष्टी आहेत ज्या करायला हव्यात आणि अशाही काही गोष्टी आहेत ज्या करू नयेत.

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला या गोष्टी एकदा कराच! तुमची तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही

वैशाख पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये:

  • भगवान विष्णूचे भक्त आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांनी या दिवशी लवकर उठून पवित्र स्नान करून दिवसाची सुरुवात केली पाहिजे. मग, त्यांनी पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे.
  • भगवान विष्णूच्या भक्तांनी देवाची मूर्ती वेदीवर ठेवावी आणि मिठाई, फुले आणि फळे अर्पण करून पूजेची तयारी सुरू करावी.
  • असे मानले जाते की, सुजाता नावाच्या महिलेने गौतम बुद्धांना खीर अर्पण केली होती. त्यामुळे या दिवशी घरोघरी खीर तयार करून गौतम बुद्धाच्या मूर्तीला अर्पण केली जाते.
  • या दिवशी मांस किंवा मसालेदार पदार्थ कोणत्याही परिस्थितीत टाळावेत. भक्तांना सात्विक खाद्यपदार्थ निवडण्याचा सल्ला दिला जातो.
  • आपण अहिंसेचा आचरण आणि उपदेश केला पाहिजे. आपण अशा गोष्टींचा विचार करू नये किंवा बोलू नये, ज्यामुळे इतरांना हानी पोहोचेल किंवा त्यांचे मन दुखावले जाईल.
  • आपण प्रत्येकाला गौतम बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण करून दिले पाहिजे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Buddha Purnima Wishes : बुद्धं शरणं गच्छामि; बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना द्या अशा खास शुभेच्छा

WhatsApp channel
विभाग